विरारमध्ये नवरात्रौत्सव मंडळाविरोधात गुन्हे, नालासोपा-यात १३ जुगा-यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:23 AM2017-09-29T03:23:17+5:302017-09-29T03:23:20+5:30
विरार येथील विवा कॉलेजमध्ये सुरु असलेल्या नवरात्रौत्सवाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नालासोपा-यात तेरा जुगा-यांना अटक करण्यात आली आहे.
विरार : विरार येथील विवा कॉलेजमध्ये सुरु असलेल्या नवरात्रौत्सवाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नालासोपा-यात तेरा जुगा-यांना अटक करण्यात आली आहे.
विवा कॉलेजमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून डीजे लावून रात्री उशिरापर्यंत गरबा खेळला जात असल्याची तक्रार काँग्रेसचे कुमार काकडे आणि भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी पालघर पोलीस अधिक्षकांकडे केली होती. त्यानंतर विरार पोलिसांनी कलम १८८, ३४, महाराष्ट्र् पोलीस अॅक्ट ३३ एन, १३१ पर्यावरण संरक्षण अधिनियम १५, ध्वनी प्रदूषण अॅक्ट ३,५,६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
तर तुळींज परिसरात जागरणाच्या नावाखाली मंडपात जुगार खेळत असलेल्या तेरा जुगारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. वसई विरार परिसरात गरबा सध्या जोरात सुरु आहे. नवरात्रौत्सव मंडळांनी पहिले दोन दिवस डीजे न लावता वेळेचेही पालन केले होते. मात्र, डीजे अभावी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तिसºया दिवसापासून सर्व नियम धाब्यावर बसवून अ़नेक मंडळांनी डीजे लावून वेळेचे बंधनही झुगारून दिले. मात्र, पोलीस त्याकडे कानाडोळा करीत होते. त्यानंतर ही कठोर कारवाई केली गेली आहे.