बहाडोली येथे काम करणारे १३ कामगार नदीत फसले; सुटकेसाठी प्रयत्न सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 21:17 IST2022-07-13T21:02:42+5:302022-07-13T21:17:17+5:30
या घटनेला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला असून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

बहाडोली येथे काम करणारे १३ कामगार नदीत फसले; सुटकेसाठी प्रयत्न सुरु
- हितेंन नाईक
पालघर- मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे महामार्गाचे काम वैतरणा नदीत सुरू असताना बहाडोली येथे काम करणारे १३ कामगार नदीत फसल्याने त्यांनी कोस्ट गार्डची मदत मागितली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी कोस्ट गार्डकडे फसलेल्या कामगारांना सोडवणूक करण्यासाठी एअर लिफ्टचा प्रस्ताव ठेवला. मात्र कोस्ट गार्डने अशा धोकादायक वातावरणात तो शक्य नसल्याने अमान्य केल्याचे कळते.
एअर लिफ्टचा प्रस्ताव अमान्य केल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून मदत मागण्याचे प्रयत्न सुरू असून मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीचा प्रवाह वाढल्याने एनडीआरएफचे प्रयत्न ही अपयशी ठरत असल्याचे कळते. त्यामुळे या फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी राज्य शासन काय प्रयत्न करते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला असून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.