अनधिकृत मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांकडून १४ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:05 PM2019-06-21T23:05:35+5:302019-06-21T23:05:45+5:30

वसई-विरार महापालिकेचा दणका; खजिन्यात भर, जनतेत समाधान

14 crore from unauthorized mobile towers companies | अनधिकृत मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांकडून १४ कोटी वसूल

अनधिकृत मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांकडून १४ कोटी वसूल

Next

नालासोपारा : वसई विरार महापालिकेने शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तीन अनधिकृत मोबाइल टॉवर्सवर कारवाई करून संबंधित कंपन्यांकडून १ कोटी ८० लाखांची रक्कम वसूल करण्यात आली असून आतापर्यंत महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये १४ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत.

मार्च २०१९ मध्ये रिलायन्स जियो कंपनी व मे २०१९ मध्ये इंडस मोबाइल टॉवरकडून मोबाईल टॉवरच्या करापोटी १२.६५ कोटी रुपये पालिकेने या आधीच वसूल केले होते. त्याचप्रमाणे बुधवारी पालिकेच्या करवसुली विभागाच्या पथकाने एटीसी कंपनीकडून मोबाइल टॉवरच्या करापोटी येणे बाकी असलेले १ कोटी ८० लाख रु पयांची रक्कम धनादेशाद्वारे वसूल केली.

वसई विरार महापालिका क्षेत्रात एकूण ५४३ मोबाईलचे टॉवर्स आहेत. त्यामध्ये फक्त २६ मोबाईल टॉवर्स अधिकृत असून बाकीचे उरलेले अनधिकृत आहेत. एकूणच महापालिका स्थापन झाल्यापासून पालिका हद्दतील मोबाईल टॉवर कंपनीकडून कर वसुलीची कार्यवाही मोठ्या प्रमाणात प्रलंबित होती. त्यावेळी पालिकेच्या मोबाईल टॉवर मालमत्ता कर थकबाकीसाठी पालिकेचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवडे व स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी एक बैठक घेऊन मालमत्ता कर विभागाचे सहा. आयुक्त विश्वनाथ तळेकरांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मोबाईल टॉवरवरील कर आकारणी करणे कामी या पथकाने वरिष्ठांच्या निर्देशानुसार एक अ‍ॅक्शन प्लान तयार करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या अ‍ॅक्शन प्लॅन पथकात सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी भावेश पाटील, मनोज पाटील व कुमार पिलेना आहेत. सततच्या पाठपुराव्यानंतर मोबाइल टॉवरवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली.

वसई तालुक्यात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारलेल्या कंपन्यांना महापालिकेने नोटीसा व देयकांची बिले बजावली आहेत. त्यानुसार कर वसूल करण्याचे काम सुरु आहे.
-विश्वनाथ तळेकर, सहाय्यक आयुक्त, कर संकलन विभाग, वसई विरार शहर महानगरपालिका

Web Title: 14 crore from unauthorized mobile towers companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.