वसईत दगडखाणींना १५२ कोटीचा दंड

By admin | Published: October 20, 2015 11:31 PM2015-10-20T23:31:48+5:302015-10-20T23:31:48+5:30

वसई पूर्वेस वालीव, राजावळी परिसरातील ५ दगड खाणींना महसूल विभागाने सील लावले असून त्यांना १५२ कोटी रू. चा दंड ठोठावण्यात आला आहे.

152 crores penalty for Vasaiyatta stones | वसईत दगडखाणींना १५२ कोटीचा दंड

वसईत दगडखाणींना १५२ कोटीचा दंड

Next

वसई : वसई पूर्वेस वालीव, राजावळी परिसरातील ५ दगड खाणींना महसूल विभागाने सील लावले असून त्यांना १५२ कोटी रू. चा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोणतीही परवानगी न घेता तसेच शासनाचा शेकडो कोटींचा महसूल बुडवून खाणी सर्रास सुरू होत्या. आठ मालकांनी ४ लाख ६६ हजार ९५४ ब्रास दगड या खाणीतून काढलेत. सर्व्हे नं. २६ वालीव येथून यलप्पा राजप्पा धोत्रे यांनी ८३ हजार ६९३ ब्रास दगड काढलेत. त्यांना ४४ कोटी ४० लाख ७ हजार ९६९ रू., यशवंत पाटील यांनी ५१ हजार ४० ब्रास दगड काढलेत, त्यांना २७ कोटी ६० लाख ६७ हजार ९९५, काशिनाथ मुकुंद पाटील - ६४ हजार ७१४ ब्रास - ३४ कोटी ३३ लाख ८ हजार ३००, गोविंद धोंडू पाटील - ८९ हजार ९८३ ब्रास - ४७ कोटी ७३ लाख ६२ हजार ८९१, अनित जयंत पिंपळे - ४७ हजार २०२ ब्रास, सर्व्हे नं. ५१ - २५ कोटी ४ लाख ९ हजार ३१५, संतोष पाटील सर्व्हे क्र. १ - २१ हजार ११८.७३ ब्रास - ११ कोटी २० लाख ३४ हजार ८६२, वसंत काशिनाथ धुमाळ - ६३ हजार ३९३ ब्रास, सर्व्हे नं. २६ - ३३ कोटी ६३ लाख ३ हजार ८४३ व अंतोनी जॉन परेरा - ४५ हजार ८११ ब्रास सर्व्हे नं. १८६/२, राजावळी २४ कोटी ३७ लाख ४३ हजार ५३० रू. असा एकूण १५२ कोटी रू. चा दंड महसूल अधिकाऱ्यांनी ठोठावला आहे.
८ पैकी ५ जणांच्या दगडखाणींना सील ठोकले असून उर्वरित तिघांना सरकारी जागेवर उत्खनन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्वांना महसूलने नोटीसा बजावल्या असून अद्याप कोणाचाही खुलासा प्रशासनाकडे आलेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: 152 crores penalty for Vasaiyatta stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.