१५५ ब्रास अवैध रेती जप्त, पाच सक्शन पंप केले नष्ट, एलसीबी, विरार पोलिसांची संयुक्त कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:06 PM2019-04-28T23:06:15+5:302019-04-28T23:06:27+5:30
नालासोपारा : दररोज पालघर पोलीस रेतीची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करत असूनही काही ठिकाणी चोरी छुपी रेतीची वाहतूक आणि ...
नालासोपारा : दररोज पालघर पोलीस रेतीची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करत असूनही काही ठिकाणी चोरी छुपी रेतीची वाहतूक आणि उपसा केला जात आहे. माहिती मिळाल्यानंतर अशीच एक कारवाई एलसीबीची टीम आणि विरार पोलिसांच्या टीमने संयुक्त कारवाई करून लाखो रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, विरार पूर्वेकडील खानिवडे गावाच्या हद्दीमधील तानसा नदीच्या किनारी रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरु वारी दुपारी १२.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एलसीबीची टीम आणि विरार पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ७ लाख ७५ हजार रु पयांची १५५ ब्रास रेती, १० लाख रु पये किंमतीचे ५ सक्शन पंप आणि ३४ हजार रुपयांच्या रेती चाळण्याच्या १७ जाळ्या असा एकूण १८ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.