महसूलची १७ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:22 PM2018-07-21T23:22:04+5:302018-07-21T23:22:35+5:30
दरवर्षी मोठ्या प्रमाणात महसूल वसूली करणाऱ्या महसूल विभागाचा रिक्तपदांचा आलेख कायम
मोखाडा : दरवर्षी मोठ्या प्रमाणात महसूल वसूली करणाऱ्या महसूल विभागाचा रिक्तपदांचा आलेख कायम आहे. तलाठ्यांची पाच कोतवालांची ४ पदे रिक्त आहेत. तालुक्यात २५९ गावपाड्यांचा समावेश असून लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. गावाचा महसूल प्रमुख म्हणून तलाठी व तलाठ्याला सहकारी म्हणून कोतवाल ही पदे महत्वाची आहेत. गारपीट, अतवृष्टी, सर्व्हे, निवडणूक, शेतसारा, आम आदमी निराधार योजनेचा अहवाल यासह विविध महत्वपूर्ण बाबी तलाठ्याकडे सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील कामाचा बोजा वाढत आहे. तर दुसरीकडे पदे रिक्त असल्याने त्यांच्याही कामाचा अतिरिक्त भार याच कर्मचाºयांवर टाकण्यात आलाआहे. तालुक्यामध्ये अवघे १ मंडळ अधिकारी ५ तलाठी व ६ कोतवाल कार्यरत आहेत तहसिल कार्यालयातही अनेक पदे रिक्त आहेत. यामध्ये कार्यालयाअंतर्गत नायब तहसीलदार १ अवल कारकून ४ शिपाई १, लिपिक १ पदे रिक्त आहेत, अशी एकूण १७ पदे महसूल विभागात रिक्त आहेत. यामुळे प्रशासकीय कामावर विपरीत परिणाम होत आहे.
याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे. मोखाडा नायब तहसीलदारांच्या रिक्त पदांमुळे इतर कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून त्यामुळे कामाची गती काही प्रमाणात कमी होत आहे. याचा फटका जनतेला बसतो आहे. तसेच प्रशासनाची गतीही मंदावते आहे. अशी खंत तहसीलमधल्या कर्मचाºयांनीच लोकमतकडे व्यक्त केली आहे.