वसई -विरारमध्ये आज १७५ कोरोनाबाधितांची नोंद; १०७ जणांना मिळाला डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 08:26 PM2020-07-01T20:26:55+5:302020-07-01T20:27:09+5:30
बुधवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 175 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
- आशिष राणे
वसई :वसई -विरार शहरात आकडे काही कमी होण्याचे नाव नाही किंबहुना बुधवारी सर्वाधिक पुन्हा रेकोर्ड ब्रेक 175 कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले तर पालिका हद्दीतील विरार- नालासोपारा स्थित 2 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 4 हजार 312 वर पोहचली आहे, तर दिवसभरात 107 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
दरम्यान बुधवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 175 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई-42 नायगाव -3 वसई-विरार- 5 नालासोपारा- 64 आणि विरार-61 यात पुरुष 101 व 74 महिला रुग्ण अशा एकूण 175 रुग्णाचा अंतर्भाव आहे.
तर पालिका हद्दीत 2 रुग्णाचा मृत्यू !
पालिका हद्दीत बुधवारी 2 रुग्णाचा मृत्यू झाल्यानं शहराची चिंता अधिक वाढतेच आहे. यात दोन्ही रूग्ण विरार- नालासोपारा मधील आहेत, त्यामुळे आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 119 इतकी झाली आहे. शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित मयत व बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने ही बाब पालिकेच्या दृष्टीने चिंतेची बनून राहिली आहे.
दिलासादायक!
वसई विरार शहरात 107 रूग्ण घरी परतले वसई विरार मनपा हद्दीत बुधवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 107 रूग्ण आपापल्या घरी परतले. यात वसई- 10 वसई- विरार-5 नायगाव- 5 नालासोपारा- 51 आणि विरार - 36 असे एकूण 107 मुक्त रूग्ण आहेत, त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 2075 वर पोहचली आहे.