भूकंपामुळे १७६ घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:49 AM2018-01-04T05:49:54+5:302018-01-04T05:50:23+5:30
जव्हार येथे सोमवरी रात्री लागलेल्या भुकंप धक्कयामुळे तब्बल १७६ घरांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. सोमवारी झालेल्या ३.२ रिश्टर स्केलच्या धक्कयामुळे तालुक्यातील चौक येथील ८०, वाळवंडा ८४ , कशीवली क्रमांक २ येथील ०८ घरे तर पाथर्डी येथील ०४ घरांना नुकसान झाले
- हुसेन मेमन
जव्हार : येथे सोमवरी रात्री लागलेल्या भुकंप धक्कयामुळे तब्बल १७६ घरांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. सोमवारी झालेल्या ३.२ रिश्टर स्केलच्या धक्कयामुळे तालुक्यातील चौक येथील ८०, वाळवंडा ८४ , कशीवली क्रमांक २ येथील ०८ घरे तर पाथर्डी येथील ०४ घरांना नुकसान झाले असून महसुल विभागाकडून यांची पाहाणी करून पंचनामे करण्यात आलेले आले असल्याची माहिती जव्हार तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली.
यामध्ये जास्ती जास्त घरांना तडे जाऊन भेगा पडलेल्या आहेत, तर काही घरांचे पीलर पुर्ण पणे वाकलेले आहेत. तर काही कुडा-मातीच्या घरांची किरकोळ पडझड झालेले आहे. पंचनामे तयार करण्याचे काम सुरू असुन नुकसान भरपाई मिळण्याकरीता त्यासंदर्भातील प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती महसूल अधिकाºयांनी दिली आहे.
तसेच शनिवारी किंवा रविवारी दिल्ली येथून डिझास्टर मॅनेजमेंटची टीम जव्हारला येणार असलच्याची शक्यता आहे अशी माहिती पालघर सुत्रांकडून मिळालेली आहे.