चिकू उत्पादकांना १८ कोटी १० लाख; ५० टक्के विमा मंजूर झालेले लाभार्थी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:15 PM2020-03-13T23:15:38+5:302020-03-13T23:15:44+5:30

या वर्षी पावसामुळे चिकू फळाचे अतोनात नुकसान झाल्याने हे कवच शेतकºयांकरिता खºया अर्थाने मदतीचा हात ठरल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त होत आहे.

18 crore 10 lakh to chiku growers; 50 percent of insurance approved beneficiaries angry | चिकू उत्पादकांना १८ कोटी १० लाख; ५० टक्के विमा मंजूर झालेले लाभार्थी नाराज

चिकू उत्पादकांना १८ कोटी १० लाख; ५० टक्के विमा मंजूर झालेले लाभार्थी नाराज

Next

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : हवामानावर आधारित चिकू फळ पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास प्रारंभ झाला असल्याने चिकू बागायतदारांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र डहाणू, पालघर, तलासरी, वसई या तालुक्यातील काही मंडळात ५० टक्के विमा मंजूर झाल्याने उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील उत्पादकांना पूर्ण विमा मिळाल्याने त्यांना लॉटरी लागली.

पूर्ण विमा मंजूर झालेल्यांना प्रति हेक्टरी ५५ हजार, तर ५० टक्के मिळणारी रक्कम २५ हजार रुपये आहे. मृग बहाराकरिता हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा वगळता उर्वरित सहा तालुक्यांतील ३८०२ चिकू उत्पादकांकडून ४३४२.९३ हेक्टर क्षेत्र विमा कवचाखाली आले होते. त्यापैकी काही मंडळात पूर्ण तर अन्य ठिकाणी ५० टक्के विमा मंजूर झाला असून १८ कोटी १० लक्ष रुपये रक्कम मार्चपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होऊ लागली आहे. या वर्षी पावसामुळे चिकू फळाचे अतोनात नुकसान झाल्याने हे कवच शेतकºयांकरिता खºया अर्थाने मदतीचा हात ठरल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त होत आहे. डहाणू तालुक्यातील पाच मंडळात कर्जदार तसेच बिगर कर्जदार ३०१० शेतकºयांकडून ३५७८.८३ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. त्यांना १५ कोटी ९८ लाख रक्कम मिळाली आहे. त्यापैकी चिंचणी, डहाणू आणि सायवण मंडळातील शेतकºयांना संपूर्ण विम्याचा लाभ मिळाला असून कासा, मल्याण मंडळात हा लाभ निम्मा असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्यातील सहा मंडळात ३०७ शेतकºयांचे विमा क्षेत्र ३५०.५२ हेक्टरवर असून ९४ लक्ष ६१ हजार रक्कम मिळाली आहे. येथे मनोर वगळता आगरवाडी, बोईसर, पालघर, सफाळे, तारापूर मंडळात ५० टक्के विमा मंजूर झाला. तलासरी तालुक्यातील तलासरी आणि झरी या दोन मंडळातील ३५८.६५ हेक्टरवरील ४३४ शेतकºयांनाही हाच अनुभव आला आहे.

बागायतींची प्रति हेक्टरी लागवड अधिक असलेल्या मंडळात केवळ ५० टक्केच विमा मंजूर झाला आहे. हे ठरवलेले निकष अन्यायकारक असून बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. - यज्ञेश सावे, चिकू बागायतदार, तलासरी

पावसामुळे चिकू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विमा मिळणे आवश्यक होते. या उत्पादकांची परिस्थिती शासन दरबारी मांडण्यात दै. ‘लोकमत’ने सुरुवातीपासून महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याने त्याचा मोठा लाभ झाला असून सर्व बागायतदार आनंदीत आहेत.
- देवेंद्र राऊत, बागायतदार, डहाणू

चिकू विम्यापोटी मिळालेल्या रकमेचा उपयोग शेतकºयांनी बागायतींच्या पुनर्जीवन आणि मशागतीसाठी करावा. पुढील वर्षी अधिकाधिक शेतकºयांनी विमा उतरवायला हवा. - संतोष पवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

Web Title: 18 crore 10 lakh to chiku growers; 50 percent of insurance approved beneficiaries angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.