तीन महिन्यांत १९ लाखांचे वाटप
By Admin | Published: February 21, 2017 05:11 AM2017-02-21T05:11:53+5:302017-02-21T05:11:53+5:30
तालुक्यातील ७८९ निराधार विधवा महिलांना, अपंग, वृध्द निराधार व ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या कुटुंब
विक्रमगड : तालुक्यातील ७८९ निराधार विधवा महिलांना, अपंग, वृध्द निराधार व ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या कुटुंब अर्थसहाय, इंदिरागांधी, श्रावणबाळ, वृध्दपकाळ, संजयगांधी अशा विविध योजनेचेअंतर्गत १९ लाख २४ हजार २०० रुपयांच्या अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले. तहसिलदार सुरेश सोनावणे निवासी तहसिलदार एस. कामडी व समितीचे अध्यक्ष संदिप पावडे यांनी ही प्रक्रीया पार पाडली.
तालुक्यातील २७ विधवा लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश देण्यांत आले आहेत़. तर अजून २० अर्ज प्रलंबित आहेत. (वार्ताहर)