बोईसरमधील फर्निचरची १९ दुकाने खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:00 AM2019-05-28T00:00:23+5:302019-05-28T00:00:30+5:30

बोईसर पूर्वे कडील चिल्हार रस्त्यावरील गुंदले गावाच्या हद्दीत सलग एकाला एक लागून असलेल्या फर्निचरची १९ दुकाने सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत खाक झालीत.

19 shops in furniture at Boisar | बोईसरमधील फर्निचरची १९ दुकाने खाक

बोईसरमधील फर्निचरची १९ दुकाने खाक

Next

- पंकज राऊत

बोईसर : बोईसर पूर्वे कडील चिल्हार रस्त्यावरील गुंदले गावाच्या हद्दीत सलग एकाला एक लागून असलेल्या फर्निचरची १९ दुकाने सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत खाक झालीत. त्या मध्ये लाखो रूपयाचे फर्निचर जळाले आगीत ३ सिलिंडरचा स्फोट झाला तर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी विद्युत लाईन वितळून गेल्याने सकाळपासून एमआयडीसीचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने कारखान्याच्या उत्पादनावर परिणाम झाला जुन्या फर्निचरची सलग असलेल्या या मार्केटला सकाळी साडे सहाच्या सुमारास आग लागली ही माहिती ६.४९ ला एमआयडीसीच्या तारापूर अग्निशमन दलाला मिळताच एक गाडी घटनास्थळी पोहचली मात्र अल्पावधीत आगीने रौद्र रूप धारण केल्याने पालघर नगर परिषद व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या प्रत्येकी एक गाडया मागविण्यात आल्या एकूण तीन गाड्यांनी चार तासात ही आग आटोक्यात आणली तर त्यासाठी सुमारे दीड लाख लिटर पाण्याचा वापर करावा लागला या आगीमध्ये एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जल शुद्धिकरण केंद्राची ११ के.व्ही. क्षमतेची उच्च दाबाची ६० मीटर लांबीचे (तीन स्पॅन) विद्युत लाईन (कंडक्टर) वितळून गेले. आगीची तीव्रता एवढी होती की आग कूलिंग केल्या नंतर दुपारी विद्युत लाईनचे काम सुरु केले तरी वीज पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरू होईल असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगीचे लोळ दुरूनही दिसत होते तर दुकानातील तसेच गोदामातील सर्व फर्निचर जळून बेचिराख झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये एक मोटार सायकल खाक झाली आहे. या दुकानात घरगुती वापराचे गॅस सिलेंडर होते त्यामधील तीन सिलेंडरचा स्फोट झाला तर काही सिलींडर बाहेर काढण्यात दुकानदारांना यश आले असले तरी एका दुकान मालकाची मोठी रोकड जळून गेली
असल्याचे समजते.
>शाळेला सुटी असल्याने मोठा अनर्थ टळला
ही दुकाने व गोडाऊन अनिधकृत असल्याची माहिती समोर येत असून याकडे एमआयडीसी आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याने आजची भीषण आग लागली तर या घटनास्थळापासून काही अंतरावर सेंट फ्रान्सिस ही शाळा आहे या शाळेच्या बसेस या दुकानाच्या जवळपास पार्क केल्या जातात आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्या पासून धोका होऊ शकला असता मात्र शाळेला सुट्टी असल्यामुळे तो टळला.

Web Title: 19 shops in furniture at Boisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.