सूर्या कॉलनीचे २ कोटी ७२ लाख बिल थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:18 AM2017-08-05T02:18:01+5:302017-08-05T02:18:01+5:30
सूर्या कॉलनीत दोन महिन्यांपासून वीज नाही २ कोटी ७२ लाख वीजबिल थकल्याने सूर्यानगर वसाहतीच्या वीजपुरवठा खंडीत केल्याने येथील कर्मचारी कुटुंबांना अंधारात रहावे लागते.
कासा : सूर्या कॉलनीत दोन महिन्यांपासून वीज नाही २ कोटी ७२ लाख वीजबिल थकल्याने सूर्यानगर वसाहतीच्या वीजपुरवठा खंडीत केल्याने येथील कर्मचारी कुटुंबांना अंधारात रहावे लागते. वीज नसल्याने पाण्यासाठी हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे.
वसाहतीचे २००१ पासूनचे म्हणजे १६ वर्षांचे ४ कोटी ६८ लाख बिल थकीत होते. त्यापेकी १ कोटी ९६ लाख वीज वापराचे बिल तर २ कोटी ७२ लाख ही वारंवार वीजबिल थकविल्याने त्यावरील विलंब आकारची रक्कम आहे. दरम्यान, वीजवापराच्या बिलाची मूळ रक्कम, १ कोटी ९६ लाख ही जलसंपदा विभागाने वीज मडळाकडे मागील महिनाभरापूर्वी भरली आहे. मात्र, वीज विलंब आकाराची रक्कम २ कोटी ७२ लाख न भरल्याने ३ मे पासून सूर्यानगर वासहतीतील वीजपुरवठा खंडित केला आहे. पावसाळ्यात दोन महिने वीज नसल्याने येथील ३० कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.