१३२ के.व्ही. सब स्टेशन कधी सुरु होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:20 AM2019-07-31T00:20:27+5:302019-07-31T00:20:43+5:30

दिनेश भट : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी; हायटेंशन वायरचे काम पूर्ण होणे बाकी

2 kV When will the sub station start? | १३२ के.व्ही. सब स्टेशन कधी सुरु होणार?

१३२ के.व्ही. सब स्टेशन कधी सुरु होणार?

Next

जव्हार : जव्हार - जामसर रोडवर १३२/३३ के.व्ही.चा वीज पुरवठा सब स्टेशन मंजूर करण्यात आले असून, बोराळा येथे सब स्टेशनचे काम वर्षभरात पूर्ण झाले आहे. मात्र हायटेंशन वायरचे काम अपूर्ण असल्याने हे सबस्टेशन तयार होऊनही सुरु झाले नसल्याने जव्हार आणि मोखाडाकरांवर त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. हे हायटेेंशन वायरचे काम पूर्ण कधी होणार? अशी विचारणा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड या ग्रामीण आदिवासी भागात नेहमीच अनियमित विद्युत पुरवठा होत असून, दिवसभरातून दोन ते तीन वेळा लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. बोराळा येथील १३२/३३ के.व्ही सब स्टेशनमुळे या समस्यांमधून ग्रामीण आदिवासी भाग लवकरच सुटेल, असे वाटत होते. मात्र, काम पूर्ण होऊन वर्ष झाले. तरीही ओव्हरहेड, हायटेंशन वायरचे काम अपूर्ण असून हे हाय पॉवरचे काम पूर्ण कधी होणार? अशी विचारणा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनेश भट यांनी नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे.

या उपकेंद्राचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला देण्यात आले आहे. बोराळे येथील हाय पॉवरच्या सबस्टेशन वरून चालतवड, खोडाळा, झडपोली या तीन ठिकाणी उपकेंद्र मंजूर आहेत. तसेच बोराला उपकेंद्राचे पूर्ण झाले असून, हायटेंशन वायरचे कामे कधी पूर्ण होणार? आदिवासी भागातील विद्युतची समस्या सुटणार कधी? असा संतप्त सवाल येथील आदिवासी बांधव करीत आहेत. यावेळी या १३२/३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे महापारेषण कंपनीच्या संचालकांनी सांगितले होते. काम तर पूर्ण झाले मात्र हायटेंशन वायर काम अद्याप चालू झालेले नाहीत.

डी.पी.सी. मध्ये मागणी केली असून हे काम लवकर झाले नाही तर आम्ही शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू.
- दिनेश भट,
जिल्हा नियोजन समिती सदस्य

महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जव्हार मोखाड्याला नेहमीच वीज खंडित होत आहे. इतका मोठा खर्च करून बोराला येथे सबस्टेशन केंद्राची उभारणी झाली. मात्र टॉवर लाईनचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वितरण विभागाल कामाचे गांभीर्य नाही. कामे तातडीने करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- सुनील भुसारा, अध्यक्ष,
राष्ट्रवादी पालघर जिल्हा

Web Title: 2 kV When will the sub station start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.