मनसे उपप्रमुखासह २० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:38 PM2019-06-15T23:38:44+5:302019-06-15T23:39:08+5:30

वसई पश्चिमेकडील कोलार गिरीज गावातील ८१ वर्षीय वयोवृद्ध महिलेला ठोशा बुक्यांनी मारहाण करून तिच्या मुलाला व सुनेला जीवे ठार मारण्याची धमकी देत घराचे मुख्य दरवाजा जेसीबीने पाडून लोखंडी ग्रील, झाडे तोडून विटा, दगड आणि इतर सामान चोरी करून नेल्याची घटना ८ जूनला घडली आहे.

20 people including MNS sub-head | मनसे उपप्रमुखासह २० जणांवर गुन्हा

मनसे उपप्रमुखासह २० जणांवर गुन्हा

Next

नालासोपारा : वसई पश्चिमेकडील कोलार गिरीज गावातील ८१ वर्षीय वयोवृद्ध महिलेला ठोशा बुक्यांनी मारहाण करून तिच्या मुलाला व सुनेला जीवे ठार मारण्याची धमकी देत घराचे मुख्य दरवाजा जेसीबीने पाडून लोखंडी ग्रील, झाडे तोडून विटा, दगड आणि इतर सामान चोरी करून नेल्याची घटना ८ जूनला घडली आहे.

वयोवृद्ध महिलेच्या तक्र ारीवरून वसई पोलिसांनी मनसे वसई तालुका उपप्रमुखासह वीस जणांवर दरोडा, धमकी, शिवीगाळ या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. वसई पश्चिमेकडील कोलार गिरीज गावातील लेभाटवाडी येथे राहणाऱ्या इस्तलीन (स्टेला) पीटर डिसिल्व्हा (८१) या वयोवृद्ध महिलेला ८ जूनला रात्री ठोशा बुक्यांनी मारहाण करून तिच्या मुलाला व सुनेला जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेची वासळई येथील सर्व्हे नंबर ४८ मधील जागेवर असलेला मेन गेट जेसीबीच्या साह्याने पाडून तसेच आंब्याची, शेवग्याची, केळीची व जांभळाची झाडे आणि लाईटचे पोल जेसीबीने तोडले.

आंब्याच्या झाडाला स्वत:च्या नावाचा बोर्ड लावून आरोपी यांनी दोन ट्रॅक्टरच्या साह्याने लोखंडी ग्रील, जाळी, विटा, दगड, केळीची झाडे, आंब्याची झाडे व इतर सामान चोरी करून नेले आहे. डिसिल्व्हा यांनी वसई पोलीस ठाण्यात जाऊन गुरुवारी तक्र ार दिल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या वसई तालुका उपप्रमुख स्वप्नील नर, वॉल्टर डॉमणिक लोपीस, गिल्डस डॉमणिक लोपीस, राहुल जैस्वाल याच्यासह अनोळखी ३० ते ३५ वयोगटातील पुरुष आणि अनोळखी ५ महिला यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 20 people including MNS sub-head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे