२१ रेतीमाफियांवर गुन्हे
By admin | Published: January 22, 2017 02:56 AM2017-01-22T02:56:52+5:302017-01-22T02:56:52+5:30
वसई तालुक्यातील नवसई आणि चांदीप रेती बंदरातील अवैध रेती उत्खननांवर महसूल खात्याने धाड टाकली. परंतु आधीच सावध झालेल्या वाळूमाफियांनी नदी पात्रात असलेल्या
विरार : वसई तालुक्यातील नवसई आणि चांदीप रेती बंदरातील अवैध रेती उत्खननांवर महसूल खात्याने धाड टाकली. परंतु आधीच सावध झालेल्या वाळूमाफियांनी नदी पात्रात असलेल्या २१ संक्शनपंप आणि बोटीसह पलायन केले. त्यामुळे फक्त ६९ ब्रास रेती जप्त करता आली. हाती लागलेल्या २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवसई बंदरात बेकायदेशिरपणे रेती उत्खनन केल्याप्रकरणी नवसई गावातील राजेश बाबूराव पाटील, कल्पेश मोरेश्वर कुडू, योगेश अरुण पाटील, सदानंद महादेव कुडू, कृपेश मंगळ पाटील, संकेत सदानंद कुडू, मितेश सदानंद कुडू, प्रदीप रविंद्र कुडू आणि भाताणे गावातील प्रभाकर हरिश्चंद्र कासार या बोटी आणि सक्शन पंप मालकांविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल खात्याच्या पथकाने त्यानंतर चांदीप रेती बंदरात धाड टाकली. यावेळी तानसा नदीपात्रात १२ बोटी सक्शनपंपासह बेकायदेशिरपणे रेती उत्खनन करताना आढळून आल्या. मात्र, पथकाची चाहूल लागताच बोटी सक्शन पंपासह नदीपात्रातून पसार झाल्या.
यावेळी रेती बंदरात ४२ ब्रास रेती साठा आढळून आला. चौकशीनंतर महसूल खात्याने बेकायदेशिरपणे उत्खनन केल्याप्रकरणी चांदीप गावातील धनंजय पुंडलिक तरे, रुपेश दत्तात्रेय पाटील, नितीन दत्तात्रेय पाटील, रविंद्र एकनाथ किणी, योगेश बळीराम पाटील, संदेश जगन्नाथ घरत, अरुण नारायण किणी, स्वप्नील रविंद्र कुडू, रोशन भालचंद्र पाटील, राजू पद्माण किणी, रुपेश बळीराम पाटील, कौशिक नारायम गावय्ऋ या बोटी आणि सक्शन पंप मालकांविरोधात विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)
मंडळ अधिकारी शशिकांत पाटील, तलाठी शैलेंद्र तिडके, किरण कदम आणि राजेश पाटील यांच्या पथकाने तानसा नदीतून चांदीप आणि नवसई रेती बंदरावर धाडी मारल्या. धाडीत नवसई रेती बंदरात नदी पात्रात सक्शन पंप बोटीसह बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुुरु असल्याचे आढळून आले. मात्र, महसूल खात्याचे अधिकारी आल्यानंतर स्नशन पंपासह बोटी गायब झाल्या. यावेळी रेती बंदरावर २७ ब्रास रेती साठा आढळून आला.