वसई विरार महापालिका हद्दीत 211 रूग्ण कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 08:55 PM2020-07-05T20:55:40+5:302020-07-05T20:56:01+5:30
पालिका क्षेत्रात ; वाढती संख्या चिंतेची बाब ; 142 रुग्ण घरी परतले.
वसई : वसई -विरार शहरात रविवारी पुन्हा 211 कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले असून शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 6 हजार 170 वर पोहचली आहे.
तर दिवसभरात 142 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान रविवारी वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 211 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई- 58 नायगाव - 9, वसई-विरार-1, नालासोपारा- 54 आणि विरार- 89 तसेच एकूण रुग्णांत 112 पुरुष व 99 महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.
रविवारी एकही मृत्यू नाही ; पण बधितांचा आकडा 6 हजार पार !
रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या 126 इतकी राहिली आहे .
तर शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस आता तर बाधित रुग्ण संख्येने 6 हजारांचा टप्पा पार केल्यानं ही बाब पालिकेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बनून राहिली आहे.
दिलासादायक ; वसई विरार शहरात 142 रूग्ण घरी परतले !
वसई विरार मनपा हद्दीत रविवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 142 रूग्ण आपापल्या घरी परतले त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 2810 वर पोहचली आहे. तर पालिका हद्दीतील विविध रुग्णालयात आजवर 3234 रूग्ण उपचार घेत आहेत.
मुक्त झालेल्यामध्ये यात अनुक्रमे
वसई - 17,नायगाव- 8 , वसई-विरार- 3 , नालासोपारा -74 आणि विरार - 40 असे एकुण 142 मुक्त रुग्ण आहेत.