गणेशोत्सवासाठी पालघर डेपोतून कोकणात २२२ जादा गाड्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:10 AM2018-08-06T02:10:11+5:302018-08-06T02:10:23+5:30
गणपती बाप्पाच्या आगमनाची आस सगळ्यांना लागली असून चाकरमान्यांना कोकणात सुखाने जाता यावे यासाठी पालघर विभागाने कोकणात गणेशोत्सवात २२२ जादा बसेस सोडण्याची जय्यत केली आहे.
- हितेन नाईक ।
पालघर : गणपती बाप्पाच्या आगमनाची आस सगळ्यांना लागली असून चाकरमान्यांना कोकणात सुखाने जाता यावे यासाठी पालघर विभागाने कोकणात गणेशोत्सवात २२२ जादा बसेस सोडण्याची जय्यत केली आहे.
कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्व असून इतर कुठल्याही सणापेक्षा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी काम, धंद्या निमित्ताने जगात कुठेही गेलेल्या कोकणवासीयाची पावले आपल्या गावाकडे वळत असतात. जिल्ह्यातील आठ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेला कोकणवासीय बांधव १३ सप्टेंबर रोजी गणेशाच्या आगमना आधीच गावा कडे जाणार असल्याने ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान पालघर विभागाने ग्रुप आणि आरक्षण(रिझर्वेशन) साठी २२२ बसेस ची व्यवस्था ठेवली आहे.
८ सप्टेंबर पासून वसई आगरातून १ आरक्षणाची व्यवस्था असलेली बस, अर्नाळा आगरातून १ बस तर नालासोपारा आगरातून २ अशा ४ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
९ सप्टेंबर रोजी वसई आगरातून १ ग्रुप, २ आरक्षण बसेस, अर्नाळा आगरातून १ ग्रुप ४ आरक्षण, नालासोपारा आगरातून ३ ग्रुप तर ७ आरक्षण, अशा ५ ग्रुप तर १३ आरक्षणाच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.
१० सप्टेंबर रोजी वसई आगरातून ५ ग्रुप तर २ आरक्षण, अर्नाळा मधून ५ ग्रुप, ४ आरक्षण, तर नालासोपारा मधून १५ ग्रुप तर ८ आरक्षण बसेस सोडण्यात येणार आहेत.
११ सप्टेंबर रोजी वसई आगरातून १५ बसेस ग्रुप साठी तर ३ आरक्षणासाठी,अर्नाळ्यातून २३ ग्रुप तर ५आरक्षण,नालासोपाऱ्यातून ८५ ग्रुप तर ७ आरक्षण बसेस सोडण्यात येणार आहेत.
१२ सप्टेंबर रोजी वसई आगरातून २ ग्रुप तर ३ आरक्षण, अर्नाळा आगरातून ४ ग्रुप तर ३ आरक्षण, नालासोपारा आगरातून ७ ग्रुप,४ आरक्षण अशा बसेस सोडण्यात येणार आहेत. .ह्या चार दिवसात एकूण १६६ ग्रुप आणि ५६ आरक्षण बसेस पालघर विभाग सोडणार असून मागणी वाढल्यास ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पालघर विभाग सज्ज असल्याचे आशिष चौधरी ह्यांनी लोकमत ला सांगितले.
रस्त्यावरील खड्ड्याची परिस्थिती प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही गंभीर असून गणपतीपूर्वी सर्व रस्त्यावरील खड्डे भरले जातील अशी आश्वासने शासनाने दिले आहे. मात्र ह्या आश्वासनावर अवलंबून न राहता कोकणात जाणाº्या प्रवाश्यांना प्रवासा दरम्यान कुठलाही त्रास अथवा असुविधा निर्माण होऊ नये म्हणून एसटी मंडळाने विशेष नियोजन केले आहे.
प्रवासा दरम्यान एसटी नादुरुस्त झाल्यास पालघर ते ठाणे पर्यंत परिवहन विभागाकडून दुरुस्ती पथकांची नेमणूक करण्यात आली असून पोलिसांच्या समन्वयाने तपासी पथके नेमण्यात आली आहेत. पुढे ठाणे, पनवेल, रायगड, रत्नागिरी हे विभाग आपल्या पद्धतीने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी तैनात राहणार आहेत.
चालक-वाहकांच्या घरातही गणेशाचे आगमन होणार असल्याने त्यांची कमतरता भासू नये ह्यासाठी पालघर विभागाने ४९ चालक-वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण केली आहे.
>प्रवासी, कर्मचारी यांची पुरेपूर काळजी
चालक व वाहकांची कमतरता भासू नये म्हणून १०० चालक- वाहकांची टेस्ट घेण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनाही सामावून घेण्यात येणार आहे.त्यांना अधिक ओव्हर टाईम मिळण्याच्या दृष्टीने ही प्रयोजन करण्यात आले आहे.
या गाड्यांवर तैनात केले जाणारे चालक आणि वाहक निर्व्यसनी असतील तसेच या सेवेसाठी पुरविल्या जाणाºया गाड्या या सुव्यवस्थित असतील याबाबतची पूर्व दक्षता कटाक्षाने घेण्यात आलेली आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी लोकमतला दिली.