जव्हारमध्ये २३५ कुपोषितांची तपासणी
By admin | Published: September 27, 2016 03:44 AM2016-09-27T03:44:40+5:302016-09-27T03:44:40+5:30
श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आज जव्हार तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांचीआरोग्य तपासणी करण्यात आली.
जव्हार : श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आज जव्हार तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांचीआरोग्य तपासणी करण्यात आली. आज तपासणी केलेल्या बालकांपैकी ७५ टक्के बालकं तीव्र कुपोषित असल्याची तपासणीत आढळले.सरकारच्या विरोधात या प्रश्नावर एकीकडे संघर्ष करत असतानाच दुसर्या बाजूला श्रमजीवीने प्रत्यक्ष गावागावात कुपोषण निर्मूलन अभियान युद्धपातळीवर सुरु ठेवले आहे.
आज जव्हार तालुक्यातील नांदगाव आरोग्य केंद्राअंतर्गत १२ गावातील ६० पाड्यातील २३५ बालकांची तपासणी बालरोग तज्ज्ञांनी केली. या शिबिरासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसायातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ श्रमजीवी कडून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बालकांना आणि मातांना ग्लुकोज बिस्किट्स आणि जेवण पुरविण्यात आले. कुपोषित बालकांना हॉस्पिटल आणि छावणी मध्ये दाखल करण्याचा सूचना यावेळी डॉक्टरांनी केल्या. सरकारने येथील आदिवासींचे दारिद्र्य निर्मूलन केले त्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार देण्याची व्यवस्था केली तरच खऱ्या अर्थाने कुपोषण निर्मूलन होईल असे मत यावेळी विवेक पंडीत यांनी व्यक्त केले.
या तपासणीत डॉ.हेमंत जोशी, डॉ.गोपाळ कडवेकर, यांचा सहभाग होता. वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पाटील, डॉ. आहेर, डॉ.मोरे यांनीही सहाय्य केले. या शिबिरासाठी दोन्ही दिवस श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित उपस्थित होते. या शिबिरासाठी सुरेश रेंजड, अशोक सापटे, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडुरंग मालक, संतोष धिंडा, गणेश माळी, कमलाकर भोर, अजित गायकवाड, महेश धांगडा, आशा भोईर, ममता परेड, वसंत वाझे, निलेश वाघ प्रमिला महाले, यांनी परिश्रम घेतले.
(वार्ताहर)