जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे २५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 12:33 AM2018-03-27T00:33:49+5:302018-03-27T00:33:49+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने स्थायीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात भाजपा सत्ताधा-यांनी पहिल्यांदाच

25 lakh in the name of the girl born | जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे २५ लाख

जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे २५ लाख

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने स्थायीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात भाजपा सत्ताधा-यांनी पहिल्यांदाच ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांच्या सूचनेनुसार ‘माझी कन्या सुकन्या’ या उपक्रमांतर्गत शहरात जन्माला येणा-या मुलीच्या नावे २५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे.

हा उपक्रम पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून केवळ आपल्या प्रभागापुरता मर्यादित ठेवला होता. मात्र, त्यात जन्म झालेल्या मुलीच्या आईचा सत्कारच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केला जात होता. यंदाही पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे जागतिक महिलादिनी कार्यक्रम केला. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे प्रभागात जन्म झालेल्या मुलीच्या आईचा सत्कार केला. या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र मेहता यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी त्याची संपूर्ण माहिती पाटील यांच्याकडून घेतली. त्यांच्या या उपक्रमाची मेहता यांनी स्तुती करून तो केवळ प्रभागापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरात त्याची सुरुवात करता येईल का, अशी विचारणा त्यांनी पाटील यांच्याकडे केली. त्यावर पाटील यांनी पालिकेच्या ‘बेटी बचाव योजनें’तर्गत शहरात अंगणवाडीपासून ते स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने महिलांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे मेहता यांच्या निदर्शनास आणून देत त्यासाठी वेगवेगळ्या लेखाशीर्षकाखाली निधीची तरतूद केली जात असल्याचे सांगितले. त्यात ‘माझी कन्या सुकन्या’ योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्याची सूचना पाटील यांनी मेहता यांना केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मेहता यांच्या मार्गदर्शनाने पालिकेचे स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी त्याच योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच शहरात दरवर्षी जन्म घेणाºया लेकींसाठी २५ लाखांच्या निधीच्या तरतुदीचा समावेश केला. त्यावर, आजच्या महासभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निधीतून शहरात जन्मलेल्या मुलीच्या नावे निश्चित रकमेची दीर्घ मुदतीची ठेव पालिकेकडून बँकेत ठेवली जाणार आहे. त्या ठेवीद्वारे त्या मुलीच्या खात्यात जमा होणारी रक्कम तिला अथवा तिच्या पालकांना मुलगी १८ वर्षे वय पूर्ण केल्यानंतर काढता येणार आहे. या योजनेचा लाभ त्या जन्मलेल्या मुलीला निश्चित वेळेत मिळावा, यासाठी तिचे पालक अथवा नातेवाइकांना आवश्यक कागदपत्रांसह पालिकेशी संपर्क साधावा लागणार आहे.

Web Title: 25 lakh in the name of the girl born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.