२५ हजारांचा दंड ५ हजार झाला कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:12 AM2018-09-28T02:12:20+5:302018-09-28T02:12:32+5:30
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता वळवी, स्वीकृत नगरसेवक सुहास सुरती यांना नाक्यावरील चाराणीय टॉवर मधील राजाराम सुपर स्टोअरमध्ये मंगळवारी संध्याकाळी गुजरातहून आणलेल्या १२० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला
तलासरी - नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता वळवी, स्वीकृत नगरसेवक सुहास सुरती यांना नाक्यावरील चाराणीय टॉवर मधील राजाराम सुपर स्टोअरमध्ये मंगळवारी संध्याकाळी गुजरातहून आणलेल्या १२० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला त्यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना याची माहिती देऊन दंडाची रक्कम विचारली असता त्यांनी २५ हजाराचा दंड लावण्यास व े. १२० किलो प्लास्टिक जप्त करण्यास सांगितले पैसे नसल्याचे सांगून दंडाची रक्कम बुधवारी सकाळी भरतो असे व्यापाऱ्याने सांगितले परंतु राजाराम सुपर स्टोअरचा मालक थानाराम बेलाराम जाट यांच्याकडून फक्त पाच हजाराची दंडाची पावती फाडून रक्कम जमा केल्याने २५ हजाराचा दंड रात्रीच्या अंधारात पाच हजार कसा झाला याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत पहिल्या वेळेस प्लास्टिक पकडल्याने नियमानुसार पाच हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.असे नगराध्यक्षांनी सांगितले.