२६ शिक्षकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:50 PM2019-03-12T22:50:11+5:302019-03-12T22:50:27+5:30
नालासोपारा पश्चिमेकडील एका शाळेच्या २६ शिक्षकांनी निवडणुकीसाठी कर्तव्य संबधातील आदेशाचे पालन न करता काम करण्यास नकार देत टाळाटाळ केल्याने कर्तव्याचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील एका शाळेच्या २६ शिक्षकांनी निवडणुकीसाठी कर्तव्य संबधातील आदेशाचे पालन न करता काम करण्यास नकार देत टाळाटाळ केल्याने कर्तव्याचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्यावत करणे, नाव नोंदणी करणे तसेच विविध कामासाठी केंद्रस्तरिय कर्मचाऱ्याना निवडणूक आयोगाने काम दिलेली होती. परंतु पश्चिमेकडील न्यू इंग्लिश स्कुलच्या २६ शिक्षकांनी १४ जुन २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान निवडणूक संबंधी कोणतेही काम करण्यास नकार दिला होता. १३२ प्रभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्चना कदम यांनी दिलेल्या आदेशावरून उमराळे तलाठी गुलाबचंद भोई यांनी सोमवारी रात्री नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन या २६ शिक्षकांविरोधात तक्र ार दिली आहे. पोलिसांनी लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अरु ण पाटील, सुरेश राठोड, राजेंद्र घरत, अमोल रावते, अभिमन्यू पवार, नरेंद्र वाघ, आरून महाले, किशोरकुमार अंगारके, विनायक जोशी, संतोष पाटील, अर्चना शेस, अंकुश वळवी, राजेश लोखंडे, राजेंद्र गोसावी, विल्यम लोपीस, सुनील म्हात्रे, हेमलता साळुंखे, भारती हातोडे, दीपाली पाटील, अरु णा शेवाळे, प्रतिभा सोनावणे, अरु ण दिवर, सुनंदा सोनावणे, संध्या पाटील, अनघा कवळी या शिक्षकांच्या विरोधात पोलिसांनी लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
त्या २६ शिक्षकांनी निवडणुकीच्या कामावर न येता कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरु द्ध तक्र ार दिली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करतील.
- प्रदीप मुकणे,
नायब तहसीलदार, वसई
२६ शिक्षकांविरु द्ध तक्र ार आल्यानंतर गुन्हा दाखल केला असून फौजदारी प्रक्रि या सहिता १९७३ प्रमाणे नमूद कलमानव्ये योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.
- सिद्धेश शिंदे, पो. उप निरिक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे