२७ लाखांचे कच्चे बेस ऑइल हस्तगत; नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 04:30 PM2023-09-15T16:30:31+5:302023-09-15T16:30:45+5:30

सिल्वासा येथील एका कंपनीने बाहेरगावावरून मुंबई पोर्ट येथे मागवलेले बेस ऑइल सिल्वासा येथील कंपनीत नेण्यासाठी ट्रान्सपोर्ट कंपनीचे मदत घेतली होती

27 lakh crude base oil seized; Success to Naigaon Crime Disclosure Branch | २७ लाखांचे कच्चे बेस ऑइल हस्तगत; नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश

२७ लाखांचे कच्चे बेस ऑइल हस्तगत; नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश

googlenewsNext

मंगेश कराळे

नालासोपारा - ३० हजार ३०० टन कच्चे बेस ऑइल अपहरण झाल्यापैकी २७ लाख रुपये किंमतीचे २७ टन कच्चे ऑइल हस्तगत करण्यात नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.

सिल्वासा येथील एका कंपनीने बाहेरगावावरून मुंबई पोर्ट येथे मागवलेले बेस ऑइल सिल्वासा येथील कंपनीत नेण्यासाठी ट्रान्सपोर्ट कंपनीचे मदत घेतली होती. दोन टँकरमधून हे ऑइल सिल्वासा येथे आणण्यात येणार होते. बेस ऑइल कंपनीत आणण्यासाठी ठाणे येथील विक्रांत रोडवेचे मालक सुजित अभीराम झा यांना सांगितले होते. त्यापैकी ३० ते ३१ ऑगस्ट दरम्यान सिल्वासा येथे एक ऑइल टँकर कंपनीत पोहोचला, मात्र दुसरा टँकर वेळेत पोहोचला नव्हता. दुस-या टॅकरमधील ३० लाख ५६ हजार ९६७ रुपये किमतीचे ३० हजार ३०० मॅट्रिक टन आॕईल ट्रकचालक ब्रिजेश यादव घेऊन येत असताना ऑइलचा टँकर चिंचोटी बापाणे पोलीस चौकी, नायगाव ब्रिज दरम्यान सदर मालाचा अपहार करत ट्रक ड्रायव्हर पळून गेला होता. या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी विनोद कुमार उमाशंकर सिंह यांनी नायगाव पोलीस ठाण्यात विक्रांत रोडवेचे मालक सुजित झा व ड्रायव्हर ब्रिजेश यादव या दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. 

सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयात अपहरीत झालेले कच्चे मटेरियल (बेस ऑईल) पैकी एकुण २७ टन (२७ लाख रुपये किंमतीचा) कच्चे मटेरियल (बेस ऑईल) भिवंडी तालुक्यातील खोनी गावातून हस्तगत करुन कंपनीला परत केले आहे. गुन्हयातील गेल्या मालापैकी ९० टक्के माल हा हस्तगत करण्यात नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश मिळाले आहे.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त पदमजा बडे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, गणेश केकान, पोलीस हवालदार देविदास पाटील, सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी केली आहे.

Web Title: 27 lakh crude base oil seized; Success to Naigaon Crime Disclosure Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.