वसईकरांना २७९ व्या वसई विजयोत्सवाचे वेध

By admin | Published: May 3, 2017 05:10 AM2017-05-03T05:10:11+5:302017-05-03T05:10:11+5:30

देशाच्या इतिहासात वसईचा रणसंग्राम मराठ्यांच्या रक्ताने लिहीला गेला. या ऐतिहासिक विजयाला या वर्षी २७९ वर्ष पुर्ण होत असून

279th Vasai Vijayottasva Vaadha of Vasikekar | वसईकरांना २७९ व्या वसई विजयोत्सवाचे वेध

वसईकरांना २७९ व्या वसई विजयोत्सवाचे वेध

Next

विरार : देशाच्या इतिहासात वसईचा रणसंग्राम मराठ्यांच्या रक्ताने लिहीला गेला. या ऐतिहासिक विजयाला या वर्षी २७९ वर्ष पुर्ण होत असून, वसई -विरार महानगरपालिका व वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळातर्फे भव्य वसई विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगर पालिकेने या विजयोत्सवाची जय्यत टायरी सुरु केली आहे.
पोर्तुगीजांच्या जुलमी अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी व हिंदू रक्षणासाठी बाजीराव पेशव्यांनी आपले बंधू चिमाजी आप्पा यांना सन १७३९ मध्ये वसई मोहिमेवर पाठवले होते. चिमाजी आप्पांनी तब्बल चोवीस महिने कडवी झुंज देऊन पोर्तुगीजांचा पराभव केला. युरोपीय सत्तेविरोधातील आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पोर्तुगीजांवर मराठ्यांच्या इतिहासातला हा पहिलाच मोठा विजय होता. या युद्धात एक कोटींची वित्तहानी होऊन बावीस हजार मराठ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.
२७९ व्या वसई विजयोत्सवानिनित्त बुधवार दि. १० मे रोजी सकाळी वसई किल्ल्यातील श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन अध्यक्ष भाऊसाहेब मोहळ, डॉमनिक घोन्सालवीस, बबनशेठ नाईक, उद्धव घरत, सुरेश वायंगणकर, यशवंत पाटील तसेच डॉ.उमेश पै यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता वसई अ‍ॅडव्हेंचर्स क्लबच्यावतीने वज्रेश्वरी देवी मंदिर ते वसई किल्ल्यापर्यंत भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. ती मध्ये देखावे, ढोलपथक तसेच दुचाकी वाहन व सायकलस्वार सहभागी होणार असल्याचे क्लबचे विजय चौधरी व प्रेषित राऊत यांनी सांगीतले.
किल्ले बांधणी प्रदर्शन, वसईतील ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, डॉ. श्रीदत्त राऊत यांच्याकडून वसई किल्ला सफर दुर्गप्रेमींना घडविण्यात येणार आहे. संध्याकाळी जाणता राजा शिवछत्रपती या महानाट्याचा प्रयोग होणार आहे.
तसेच बच्चेकंपनीसाठी बालजत्रेचे व खाद्यमहोत्सवाचे आयोजनही यावेळी करण्यात येणार आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर प्रविणा ठाकूर, खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार विलास तरे, उपमहापौर उमेश नाईक, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील, आयुक्त सतिश लोखंडे तसेच नारायण मानकर उपस्थीत राहतील. विरार, नालासोपारा, वसई व नायगांव पश्चिमेकडून परिवहन सेवेची सुविधा ठेवण्यात आलीे आहे. (वार्ताहर)

शनिवार-रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम

वसई -विरार महानगरपालिकेच्या स्थापनेपासून वसईत गेल्या काही वर्षात या दिनानिमित्त विविध  कार्यक्र म केले जातात. २७९ व्या वसई विजयोत्सवानिमित्त पालिकेकडून बुधवार दि. १० मे व शनिवार -रविवार १३ व १४ मे २०१७ रोजी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्र म ठेवण्यात आले आहेत.

Web Title: 279th Vasai Vijayottasva Vaadha of Vasikekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.