पुन्हा एकदा तारिख पे तारीख! २९ गावे वसई विरार महानगरपालिकेत राहणार की वगळण्यात येणार; आता पुन्हा अंतिम सुनावणी ४ मार्चला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 09:20 PM2021-02-25T21:20:28+5:302021-02-25T21:21:00+5:30
वसई-विरार शहर महापालिकेतून 29 गावे वगळण्याच्या महत्त्वाच्या याचिका प्रकरणावर गुरुवार दि.25 फेब्रुवारी रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. किंबहुना महापालिकेतून 29 गावे वगळतील की राहतील यावर देखील गुरुवारी ऐतिहासिक फैसला येणार होता.
आशिष राणे,वसई
वसई-विरार शहर महापालिकेतून 29 गावे वगळण्याच्या महत्त्वाच्या याचिका प्रकरणावर गुरुवार दि.25 फेब्रुवारी रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. किंबहुना महापालिकेतून 29 गावे वगळतील की राहतील यावर देखील गुरुवारी ऐतिहासिक फैसला येणार होता.
मात्र 29 गावे व त्या संदर्भातील सर्व एकत्रित याचिका इतर महत्त्वाच्या याचिकेवरील सुनावणी संध्याकाळी 4.30 वाजले तरी सुरूच राहीली होती,किंबहुना गावांची एकत्रित याचिका यामुळे सुनावणीसाठी पटलावर न आल्याने अखेर मा मुंबई उच्च न्यायालयाने 29 गावांच्या याचिकेवर पुढील आठवड्यात दि,4 मार्चला दुपारी 2.30 वाजता पटलावर याचिका घेणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीनं पालघर जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर व याचिकाकर्ते ऍड.जिमी घोंनसालवीस यांनी लोकमतला दिली.
दरम्यान महापालिकेतून 29 गावे वगळतील की जैसे थे राहतील याकडे संपूर्ण वसईकरांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते परंतु पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या बाजूनं निर्णय न आल्याने हिरमोड झाला आहे. परिणामी मागील 10 वर्षापासून हे गावांचे प्रकरण मा.मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे,
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निवडणूक वचननामा व आश्वासना नुसार 29 गावे वगळली जातील अशी मोठी आशा येथील पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांना आहेच तर मागील वर्षी मार्च 2020 पासून कोरोनामुळे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता पुन्हा प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने 29 गावांचा प्रश्न पुन्हा रखडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने पंधरा दिवसांपूर्वीच राज्य शासनाच्या वतीनं तात्काळ सुनावणी घेण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यामुळे मा मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी सर्व याचिकाकर्त्यांना आपली बाजू मांडून अंतिम सुनावणी घेण्यासाठी दि. 25 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. आणि दि 25 फेब्रुवारी ला गुरुवारी दुपारी मा मुंबई उच्च न्यायालयाच्या 46 क्रमांकाच्या दालनात मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्यापुढे ही सुनावणी होणार होती. परंतु संध्याकाळी उशिरा पर्यंत याचिकेवर सुनावणीच न झाल्याने अखेर पुन्हा पुढची 4 मार्च तारीख देण्यात आली.
29 गावे वगळली तर वसई विरार शहर महापालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी नक्कीच पुढे ढकलली जाईल हे तर सर्वश्रुत आहे.
दहा वर्ष स्थगिती ; तर महापालिकेचा जैसे थे आदेश तांत्रिक मुद्यावर रद्द करावा ! अन्यथा महापालिका निवडणूका ही लांबतील ?
महापालिकेने गावे वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने आणि महापालिकेची याचिका जर आज तांत्रिक मुद्द्यावर रद्द केली तर तात्काळ हा मुद्दा निकाली निघेल आणि जर गावे वगळण्याचा निर्णय झालाच तर शहराची रचना ही बदलेल त्यामुळे नव्याने प्रभाग रचना ,आरक्षण सोडत त्यावर पुन्हा सूचना व हरकती होतील आणि निवड प्रक्रिया आणखी लांबणीवर पडेल
तर आता पाहू या पुढील तारीख पी तारीख चा हा सिलसिला कुठपर्यंत सुरू राहतो पुन्हा एकदा पुढील 4 मार्च गुरुवारच्या सुनावणी कडे गावकऱ्यांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे