मोबाइल टॉवर कंपनीकडून तीन कोटी २० लाख वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:19 AM2020-08-19T01:19:17+5:302020-08-19T01:19:29+5:30
मोबाइल टॉवर कंपनीकडून २०२०-२१ या वित्तीय वर्षात करापोटी तीन कोटी २० लाखांची वसुली केल्याची माहिती करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
वसई : कोरोना संकटामुळे उत्पन्नाचे स्रोत आटल्याने वसई-विरार पालिकेला दुहेरी आघाडीवर लढावे लागत आहे. मात्र, पालिकेला लॉकडाऊ नच्या काळात इंडस टॉवर या मोबाइल टॉवर कंपनीकडून २०२०-२१ या वित्तीय वर्षात करापोटी तीन कोटी २० लाखांची वसुली केल्याची माहिती करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
वसई-विरार शहर महापालिकेच्या स्थापनेपासून पालिका हद्दतील मोबाइल टॉवर कंपनीकडून मालमत्ता करवसुलीची कार्यवाही मोठ्या प्रमाणात प्रलंबित होती. त्यावेळी पालिकेच्या मोबाइल टॉवरची मालमत्ता करआकारणीपोटी योग्य कार्यवाहीसाठी पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी मालमत्ताकर संकलन विभागाचे तळेकर यांना सूचना दिल्या होत्या.
>पालिकेच्या पथकातील विश्वनाथ तळेकर, भावेश पाटील, मनोज पाटील आणि कुमार पिलेना यांच्या पाठपुराव्यानंतर या मोबाइल टॉवरवर मालमत्ताकराची यशस्वी आकारणी केली. सोमवार, १७ आॅगस्ट रोजी मे. इंडस टॉवर प्रा.लि. या मोबाइल टॉवर कंपनीने प्रत्यक्ष मालमत्ताकरापोटी पालिकेच्या तिजोरीत तीन कोटी
२० लाखांचा धनादेश सुपूर्द केला.