३ आॅक्टोबरला पेन्शन दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:14 AM2018-09-12T05:14:03+5:302018-09-12T05:14:05+5:30
डीसीपीएस (परिभाषित अंशदायी पेन्शन योजना) ही पेन्शन योजना बंद करून १९८२ची जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी
पालघर : डीसीपीएस (परिभाषित अंशदायी पेन्शन योजना) ही पेन्शन योजना बंद करून १९८२ची जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेकडो शिक्षक व इतर विभागातील शासकीय कर्मचारी शिवनेरी किल्ला ते मंत्रालय मुंबई असे १५० किमीचे अंतर ‘पेन्शन रन’ म्हणून चार दिवस धावून पार करणार आहेत.
तीनहात नाका ठाणे ते मंत्रालय हे ३५ किमी पेन्शन दिंडी काढून राज्यातील ७० हजार शिक्षक व शासकीय कर्मचारी ३ आॅक्टोबर रोजी मंत्रालयावर धडकणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी शिवनेरी येथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून रनला सुरुवात होईल. २ आॅक्टोबरला ठाण्यात, तर ३ आॅक्टोबरला आझाद मैदानात उपोषण करणार असल्याचे जिल्हा पेन्शन संघटनेचे प्रवक्ते दत्ता-ढाकणे बाविस्कर यांनी सांगितले.