विरारमध्ये सासऱ्याकडून २२ वर्षीय सुनेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 12:17 AM2019-07-31T00:17:04+5:302019-07-31T00:17:38+5:30

नात्याला कलंक : मोबाइलच्या कॅमेºयाद्वारे सुनेने केला प्रकार उघड

 3-year-old son-in-law violated by father-in-law in Virar | विरारमध्ये सासऱ्याकडून २२ वर्षीय सुनेचा विनयभंग

विरारमध्ये सासऱ्याकडून २२ वर्षीय सुनेचा विनयभंग

googlenewsNext

वसई : सासरा - सुनेच्या नात्याला कलंक लागल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. घरातील सर्व माणसे कामावर गेल्याची संधी साधून सासºयाने मुलीसमान सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघड झाली. सुनेच्या तक्रारीवरुन सासºयाच्या विरोधात विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लागलीच या वासनांध तसेच व्यवसायाने रिक्षा चालक असलेल्या आरोपीला गजाआड केले आहे.

सासºयाच्या या कृत्याबाबत पती, सासू, दीर यांना सांगूनही तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नसल्याने कंटाळून सुनेने प्रसंगावधान राखत सासºयाची ही विकृती मोबाइलच्या कॅमेºयात कैद केली आणि अखेर ही धक्कादायक घटना घरच्या लोकांसमोर उघड केली.
सविस्तर माहितीनुसार, आरोपी सासरा हा रिक्षाचालक असून तो पहाटे साडेतीनच्या सुमारास रिक्षा चालवायला जायचा. त्यानंतर पुन्हा सकाळी साडे आठ वाजता तो घरी यायचा. तो जेव्हा घरी येत होता, तेव्हा त्याची २२ वर्षीय सून घरी एकटीच असे.
महिन्याभरापासून हा सासरा आपल्या सुनेकडेच वाकड्या नजरेने बघत होता. त्यातच अलीकडे सासºयाने आपल्या सुनेला स्पर्श करुन तिच्याशी जवळीक साधत होता. पण ही विवाहिता त्या वासनांध सासºयाला विरोध करत होती.
शेवटी विरार पोलीस ठाण्यात सुनेने सासºयाच्या विरोधात सर्व हकीकत तक्र ारीत नमूद केली. सुनेच्या तक्र ारीवरुन सासºयाने विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी सासºयाला बेड्या ठोकल्याचे विरारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल दबडे यांनी सांगितले.

सुनेला नांदायचे नसल्याने आरोप करत असल्याचा संशय
च्अनेकदा सुनेने ही घटना सासू, पती आणि दीर यांना सांगितली. मात्र कुणाचाही यावर विश्वास बसला नाही. याउलट तिच्यावरच अविश्वास दाखवून तिला नांदायचे नसल्याने ती असे आरोप करीत असल्याचे तिला सांगत होते.
च्यामुळे शेवटी सुनेनेच शक्कल लढवून हा प्रकार मोबाइलमध्ये कैद करून सासºयाचा भांडाफोड करण्याचे ठरवले. आता या घटनेला वाचा फुटली असून विवाहीत तरुणीने आपल्या मोबाइल कॅमेºयात सासºयाची विकृती कैद केल्यानंतर हा सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. त्याचवेळी पती-सासू, दीर यांनाही सांगितले.

Web Title:  3-year-old son-in-law violated by father-in-law in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.