VIDEO : डहाणूच्या पश्चिम घाटात आढळले काटेसावरीचे 300 वर्षांचे झाड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 11:18 AM2018-04-24T11:18:44+5:302018-04-24T11:19:12+5:30
पालघर जिल्ह्यातील काटे सावरीचे सर्वात जुने झाड डहाणू तालुक्यातील गांगणगाव गावी आहे. ते सुमारे 300 वर्षांचे असून त्याचा बुंध्याचा घेर 680 सेमी असून उंची 25 मीटर आहे. तर आकार व उंचीने सर्वात मोठे बिबळा हे झाड पालघर तालुक्यातील नागझरी या गावी आढळले आहे.
- अनिरुद्ध पाटील
डहाणू - पालघर जिल्ह्यातील काटे सावरीचे सर्वात जुने झाड डहाणू तालुक्यातील गांगणगाव गावी आहे. ते सुमारे 300 वर्षांचे असून त्याचा बुंध्याचा घेर 680 सेमी असून उंची 25 मीटर आहे. तर आकार व उंचीने सर्वात मोठे बिबळा हे झाड पालघर तालुक्यातील नागझरी या गावी आढळले आहे. त्याची जाडी 253 सेमी आणि उंची 28 मीटर असल्याची नोंद वन विभागाच्या दफ्तरी करण्यात आली आहे. पश्चिम घाटाच्या जंगलात आढळलेल्या वृक्षाचे मोजमाप डहाणू उपवन संरक्षक एन. लडकत यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या बाबतची माहिती सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली असून त्याला नेटकार्यांनी भरपूर लाईक दिल्या आहेत. त्या जागांचे अचूक लोकेशन दिल्याने उत्सुकतेपोटी काही निसर्गप्रेमींनी तेथे जाऊन भेट दिली आहे. जिल्ह्यातील वन पर्यटनाला त्या मुळे चालना मिळणार आहे.