वसई-विरार पालिका क्षेत्रात आज ३०५ कोरोनाबाधितांची नोंद; ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 10:58 PM2020-07-02T22:58:15+5:302020-07-02T22:58:28+5:30
गुरुवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 305 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
- आशिष राणे
वसई : वसई -विरार शहरात आकडे काही कमी होण्याचे नाव नाही किंबहुना गुरुवारी सर्वाधिक पुन्हा रेकोर्ड ब्रेक 305 कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले तर पालिका हद्दीतील वसई- नालासोपारा स्थित 5 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 4 हजार 617 वर पोहचली आहे. तर दिवसभरात 114 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
दरम्यान गुरुवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 305 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई- 87 नायगाव - 3 वसई-विरार- 4 नालासोपारा- 119 आणि विरार- 92 यात पुरुष 172 व 133 महिला रुग्ण अशा एकूण 305 रुग्णाचा अंतर्भाव आहे.
तर पालिका हद्दीत 5 रुग्णाचा मृत्यू !
पालिका हद्दीत गुरुवारी 5 रुग्णाचा मृत्यू झाल्यानं शहराची चिंता अधिक वाढतेच आहे,. यात दोन्ही रूग्ण वसई मधील 2 आणि नालासोपारा मधील 3 रुग्ण आहेत .त्यामुळे आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 124 इतकी झाली आहे . शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित मयत व बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने ही बाब पालिकेच्या दृष्टीने चिंतेची बनून राहिली आहे.
दिलासादायक ; वसई विरार शहरात 114 रूग्ण घरी परतले !
वसई विरार मनपा हद्दीत गुरुवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 114 रूग्ण आपापल्या घरी परतले यात वसई- 22 वसई- .विरार- 4 नायगाव- 2 नालासोपारा- 59 आणि विरार - 27 असे एकूण 114 मुक्त रूग्ण आहेत, त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 2189 वर पोहचली आहे.