पालघर जिल्ह्यात ३३ लाचखोर पकडले; भ्रष्ट्राचा-यांची माहिती द्या, पोलीस उपअधीक्षक आफळे यांचे जनतेला आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:41 AM2017-10-31T03:41:11+5:302017-10-31T03:41:25+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आफळे यांनी केले आहे.
- हितेंन नाईक
पालघर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आफळे ह्यांनी केले आहे.
पालघर, डहाणू, तलासरी इ.तालुक्यातील तक्रारकर्त्या नागरिकांना ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे असलेले कार्यालय लांबचे पडत असल्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाºया विरोधात इच्छा असूनही तक्र ारी दाखल केला जात नव्हत्या. मात्र आता स्वतंत्र पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर आठ तालुक्यातील नागरिकांना पालघर च्या सूर्या कॉलनी मध्ये असलेले कार्यालय सोईचे पडू लागल्याने तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत. पालघरच्या प्रांताधिकाºयांना ५० लाखाची लाच मागणे, आदिवासी प्रकल्प अधिकारी, जव्हार यांना ५० हजाराची, तसेच वसई-विरार महानगर पालिकेतील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस इ. ३३अधिकारी कर्मचाºयांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीरीत्या सापळा रचून अटक केली असून ९ अधिकाºयावर उत्पन्न पेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी कारवाई केल्याने हळूहळू लोकांमध्ये लाचलुचपत विभागा बद्दल विश्वास निर्माण होऊ लागला आहे.लोकांनी अधिकाधिक संख्येने पुढे यावे यासाठी आजपासून (३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर) दक्षता जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व कार्यालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागात भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाºया लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करणारे फलक लावून त्यावर कार्यालयीन पत्ता, फोन नंबर, इ. लावणे सक्तीचे केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा इ.भागात ही भ्रष्टाचाराविरोधातील जनजागृती व्हावी ह्यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने, निबंध स्पर्धा इ.चे आयोजन पालघर विभागांतर्गत करण्यात येणार आहे.
राज्यात प्रत्येक वर्षी सरदार वल्लभ भाई पटेल ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व विभागा मध्ये शपथ घेऊन त्याची सुरूवात झाली