वादातून मुलाने केले आईवडिलांवर ३५ वार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 05:22 AM2019-01-30T05:22:49+5:302019-01-30T05:23:08+5:30

आर्थिक वादाचे पर्यावसन; स्क्रू ड्रायव्हर, सुरा, चाकू व हातोड्याचा वापर

35 years old parents have made a promise | वादातून मुलाने केले आईवडिलांवर ३५ वार

वादातून मुलाने केले आईवडिलांवर ३५ वार

googlenewsNext

नालासोपारा : मुलाने पैशांच्या कारणावरून झालेल्या भांडणातून आपल्या आईवडिलांवर ३५ वार केल्याची घटना सोमवारी पहाटे नालासोपाऱ्यात घडली. जखमी आईवडीलांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नालासोपारा पश्चिमेकडील इम्पिरिअल टॉवरच्या सी विंग २०२ मध्ये नरेंद्र पवार पत्नी नर्मदा आणि मुलगा जन्मेशसोबत राहतात. जन्मेश (२०) हा शेवटच्या वर्षाला असून, शेअर मार्केटमध्ये पार्ट टाइम नोकरी करतो. त्याचे सोमवारी रात्री आईवडिलांसोबत पैशांवरून भांडण झाले होते. पहाटे पावणे चारच्या सुमारास जन्मेशने झोपलेल्या वडील नरेंद्र (५५) आणि आई नर्मदा (५०) यांच्यावर स्क्रू ड्रायव्हर, सुरा, एक चाकू आणि हातोड्याच्या साहाय्याने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात आई-वडिलांना टाकून त्याने पहाटे कपडे बदलून पळ काढला.
इमारतीमधील लोकांनी नालासोपारा पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी आईवडिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये पाठविले. मात्र, नंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दोन्ही जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आरोपी जन्मेश हा कपडे बदलून बॅग घेऊन आणि तोंडाला हेल्मेट लावून पहाटे साडे चारच्या सुमारास पळून गेल्याचे इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- राजू नरवडे, सहायक पोलीस निरीक्षक (नालासोपारा पो. स्टेशन)

Web Title: 35 years old parents have made a promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून