पालिका पोटनिवडणुकीसाठी ४ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:33 AM2018-06-27T01:33:45+5:302018-06-27T01:33:48+5:30
शिवसेनेचे नगरसेवक दिवंगत अमोल औसरकर यांच्या निधनाने रीक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ६ ची पोटनिवडणुक जाहीर झाली असून यासाठी काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४ अर्ज दाखल झाले
जव्हार : शिवसेनेचे नगरसेवक दिवंगत अमोल औसरकर यांच्या निधनाने रीक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ६ ची पोटनिवडणुक जाहीर झाली असून यासाठी काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४ अर्ज दाखल झाले असून यातील दोन अर्ज दिवंगत औसरकर यांचे लहान बंधू स्वप्नील औसरकर यांचे आहेत. कॉंग्रेसकडून प्रतिक काजळे तर जहिर शेख यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
मुळात ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न शिवसेनेचा असून निधन झालेल्या उमेदवाराच्या भावालाच उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी आणि भाजपाने याला पाठींबा दिला आहे यामुळे या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही मात्र अनपेक्षितपणे कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज भरल्याने आता माघारीपर्यंत या निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार नाही दुसरीकडे एका अपक्षानेही अर्ज दाखल केल्याने त्यांची समजूत काढायची कशी? हा पेच सेनेपुढे आहे.
मुळात जव्हार नगरपरिषद निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढली होती मात्र एकाही जागेवर त्यांना विजय मिळविता आला नाही अशातच ही पोटनिवडणूक सर्वानुमते बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू असतांना कॉंग्रेसने मात्र माघार घेण्यास नकार दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यामुळे जव्हारच्या या निवडणूकीचे चित्र माघारीच्या दिवशी म्हणजे २ जुलै २०१८ रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र तूर्तास सेनेकडून कॉंग्रेसची मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे.