४ मजल्याची इमारत पण ७ व्या मजल्यावरील फ्लॅट विक्री करून पोलिसालाच साडेबारा लाखास गंडवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:34 PM2023-08-19T12:34:20+5:302023-08-19T12:34:49+5:30

महापालिके कडून वरच्या मजल्यांची बांधकाम परवानगी अजून मिळाली नाही सांगत तिघांनी डिसोझा यांना फ्लॅट दिला नाहीच शिवाय पैसे परत करण्यास टाळाटाळ केली.

4 floor building but the flat on the 7th floor was sold to police; Fraud of 12.50 lkh | ४ मजल्याची इमारत पण ७ व्या मजल्यावरील फ्लॅट विक्री करून पोलिसालाच साडेबारा लाखास गंडवले 

४ मजल्याची इमारत पण ७ व्या मजल्यावरील फ्लॅट विक्री करून पोलिसालाच साडेबारा लाखास गंडवले 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - ४ मजल्याची बांधकाम परवानगी असताना ७ व्य मजल्यावर अस्तित्वात नसलेला फ्लॅट मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यास विकून त्याची साडेबारा लाखांना फसवणूक केल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे . 

मुंबई पोलीस दलात सहायक उपनिरीक्षक असलेले विल्यम डिसोझा हे भाईंदर पूर्वेच्या गोडदेव गावा मागील व्ही एम हाईट्स इमारतीत भाड्याने राहतात . व्ही एम हाईट्स च्य कार्यालयात मेघ डेव्हलपर्स चे भागीदार संजय चित्रोडा आणि त्यांची बहीण चेतना यांनी इमारतीच्या ७ व्य मजल्यावरील सदनिका ४६ रुपयांना विक्री करायचे सांगितले . डिसोझा यांनी ५१ हजार टोकन रक्कम नोव्हेम्बर २०२० मध्ये भरली .

नंतर चित्रोडा , चिंतन सह स्वयं आणि मेघना डेव्हलपर्स चे भागीदार म्हणवणारे किशोर शाह यांची कार्यालयात भेट झाली असता आता ३० लाख भराल तर फ्लॅटची किंमत आणखी कमी करू असे सांगितले .  डिसोझा यांनी यांची पूजा गार्डन मधील सदनिका विकून २७ लाख शाह याच्या खात्यात भरले . नंतर डिसोझ यांना एमओयू , रेरा प्रमाणपत्र , महापालिकेची कागदपत्रे दिली . 

परंतु महापालिके कडून वरच्या मजल्यांची बांधकाम परवानगी अजून मिळाली नाही सांगत तिघांनी डिसोझा यांना फ्लॅट दिला नाहीच शिवाय पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागले . २०२२ च्या अखेरीस शाह याने १५ लाख रुपये डिसोझा याना परत केले . ४ मजल्याची परवानगी असताना ७ व्या मजल्याचा फ्लॅट विकून १२ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केली बद्दल १७ ऑगस्ट रोजी नवघर पोलीस ठाण्यात डिसोझा यांनी फिर्याद दिल्यावर चित्रोडा , शाह व चेतना ह्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे .

Web Title: 4 floor building but the flat on the 7th floor was sold to police; Fraud of 12.50 lkh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.