वसईतील चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 106 पर्यटकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:11 PM2018-07-07T17:11:04+5:302018-07-08T03:04:37+5:30
पाण्याचा प्रवाह वाढल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे
वसई : वसईतल्या चिंचोटी धबधब्यावर जवळपास 107 पर्यटक आले होते. त्यातील 106 पर्यटकांना वाचवल्याची माहिती समोर आली आहे. कांदिवली पूर्व येथे राहणाया 35 वर्षीय भावेश गुप्ता याचा बुडून मृत्यू झाला आहे. चिंचोटी धबधब्यावर 26 पर्यटक डेंजर झोनमध्ये अडकले होते. एनडीआरएफ आणि स्थानिकांनी बचावकार्य राबवून त्यांना वाचवलं आहे. वसईतल्या चिंचोटी धबधब्यावर आलेले पर्यटक हे मुंबईतल्या सांताक्रूझ, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि नवी मुंबईतल्या ऐरोली येथून आले होते. चिंचोटी धबधब्यात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे काम पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, NDRF Team, अग्निशमन दल, वसई विरार महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक गावकरी यांचे मदतीने करण्यात आले आहे.