अनुकंपेने भरती केलेल्या ४४ जणांना ‘शो कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:31 AM2018-12-03T00:31:57+5:302018-12-03T00:32:04+5:30

जिल्हा परिषद अंतर्गत सन २०१७ मधील अनुकंपा कर्मचारी भरती प्रक्रिये मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (अनियमतिता) झाल्याने संबंधिता विरोधात कारवाई होणार असल्याचे लोकमतचे वृत्त खरे ठरत आहे.

44 people recruited in sympathetic 'Show Cause' | अनुकंपेने भरती केलेल्या ४४ जणांना ‘शो कॉज’

अनुकंपेने भरती केलेल्या ४४ जणांना ‘शो कॉज’

Next

- हितेन नाईक 
पालघर : जिल्हा परिषद अंतर्गत सन २०१७ मधील अनुकंपा कर्मचारी भरती प्रक्रिये मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (अनियमतिता) झाल्याने संबंधिता विरोधात कारवाई होणार असल्याचे लोकमतचे वृत्त खरे ठरत असून नियुक्त उमेदवारांना तुमची नेमणूक रद्द करून सेवा संपुष्टात का आणण्यात येऊ नये अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकरांनी बजावली आहे.
पालघर जिल्हा निर्मिती नंतर ठाणे जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीच्या यादी मधील ४९ कर्मचाऱ्यांच्या नेमणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये पालघर जिल्हा परिषदे कडून घाईघाईने करण्यात आले होते. त्याच वेळी ठाणे जिल्हापरिषदेने मात्र अनुकंपा भरती प्रक्रिया टाळली होती. सामान्य प्रशासन विभागांतर्गत १० टक्के प्रमाणे नियमानुसार अवघ्या ५ जागा भरणे गरजेचे असतांना ह्या विभागाचे प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी ह्यांच्या सह अन्य अधिकाºयांच्या समितीने अधिक ४४ उमेदवारांची नियुक्ती केली होती. ह्या प्रकरणात प्रत्येक उमेदवारा कडून लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. ह्या अनियमित भरती प्रक्रिये विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटीलांसह अनेकांनी स्थायी समितीत आवाज उठविला होता. ह्या प्रकरणी त्रिसदस्यीय कमिटी नियुक्त करण्यात आल्या नंतर तीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सुपूर्द केला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर ह्यांनी ३० नोव्हेंबर रोजी ह्या भरती केलेल्या ४९ उमेदवारांना एक पत्र पाठविले असून २०१७ मध्ये अनुकंपा भरती प्रक्रिये मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या स्थायी समिती मध्ये घेण्यात आलेल्या गंभीर आरोपा बाबत कळविले आहे.
तुमची नेमणूक करतांना माहे जानेवारी २०१७ च्या रिक्त पदांच्या अनुषंगाने भरलेली पदे वित्त विभागाकडील २ जून २०१५ च्या शासन निर्णया नुसार रिक्त नसतांना पदांची भरती केलेली आहे. त्यामुळे जिप पालघरच्या सेवेत केलेली नेमणूक ही अतिरिक्त व नियमबाह्य असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तुम्हाला जिल्हा परिषद सेवेत दिलेले नेमणुकीचे आदेश रद्द करून तुमची सेवा संपुष्टात का आणण्यात येऊ नये? याचा खुलासा १५ डिसेंबर च्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास व तुमचे समाधानकारक उत्तर न आल्यास आदेश क्र. पाजिप/साप्रवी/आस्था ३ अ/वशी च्या आदेशान्वये जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेली नेमणूक रद्द करून सेवा समाप्त करण्यात येईल ह्याची नोंद घेण्या बाबत कळविले आहे.
>त्या अधिकाºयांवर कारवाई होणार?
नियमबाह्य पद्धतीने भरती केलेल्या कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा जरी जिल्हा परिषदेने उचलला असला तरी ह्या भरती प्रक्रि ये मधून कोट्यवधी रुपयांची माया गोळा करणाºया अन्य मोठ्या अधिकाºयांविरोधात मुख्याधिकारी काय कारवाई करतात ह्या कडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: 44 people recruited in sympathetic 'Show Cause'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.