अर्बनसाठी ४४ टक्के मतदान

By Admin | Published: July 30, 2015 12:33 AM2015-07-30T00:33:35+5:302015-07-30T00:33:35+5:30

जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. पावसाचे कारण असले तरी एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स)

44 percent polling for the urban areas | अर्बनसाठी ४४ टक्के मतदान

अर्बनसाठी ४४ टक्के मतदान

googlenewsNext

जव्हार : जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. पावसाचे कारण असले तरी एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स) मुळे व थकीत कर्ज प्रकरणासाठी चर्चेत असणाऱ्या या बॅँकेच्या निवडणुकीत मतदानाचा उत्साह दिसला नाही.
जव्हारमधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या बॅँकेचे मतदान जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड, मनोर, वाडा, कुडूस असे एकूण १०,५८६ आहेत. त्यापैकी ४७२७ म्हणजे ४४.६५ टक्के सर्वत्र मतदान झाले. यामध्ये १७ संचालकपदांसाठी एकूण ३५ उमेदवार रिंगणात होते. त्यात सहकार व शिवनेरी पॅनलचे व २ अपक्ष उमेदवार असे रिंगणात होते. परंतु, पावसाचा मोठ्या प्रमाणावर मतदानावर विपरीत परिणाम झाल्यामुळे यात कुठल्या पॅनलचे पारडे जड होणार, याची खात्री कुठल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांना सांगता येत नाही.
या निवडणुकीत सर्वसाधारण १२ जागांसाठी २५ उमेदवार, तर राखीवमध्ये एससी, एसटीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, ओबीसीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, एनटीच्या एका जागेसाठी २ उमेदवार तर महिलांसाठी राखीव असणाऱ्या दोन जागांसाठी ४ उमेदवार असे एकूण ३५ उमेदवार रिंगणात उतरले होते. याकरिता जव्हार येथे ८ बूथ, मनोर २ बूथ, खोडाळा १, विक्रमगड ३, मनोर ३, वाडा १, कुडूस १ असे एकूण १९ बूथचे नियोजन सहकार विभागाने केले होते. याकरिता ९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

निवडणूक रंगतदार
यात मजेदार बाब म्हणजे एका मतदाराला तब्बल १७ उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यामुळे निवडणूक रंगतदार झाली. काही मतदार आपल्या आवडीच्या निवडक उमेदवारांना मते द्यायचे तर कोणी पूर्ण पॅनलच्या उमेदवारांना मते द्यायचे. त्यामुळे निकाल काय असेल, याचा नेम नाही.

मतदार यादीमध्ये गोंधळ
मतदार यादीमध्ये अनेक जुन्या व नवीन मतदारांची नावे नसल्याच्या आज तक्रारी समोर आल्या तर अनेकांची नावे मनोरमध्ये तर मनोरमधील विक्रमगडमध्ये असे प्रकार घडल्याची तक्रार घनश्याम आळशींनी केली.

निवडणुकीतील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, मनोर, बोईसर, कुडूस या केंद्रांतील मतमोजणी ३० जुलै रोजी जव्हार येथे होणार आहे़ साधारण: संध्याकाळपर्यंत निकाल हाती येतील अशी अपेक्षा आहे.

Web Title: 44 percent polling for the urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.