रेल्वे अपघातात ४३ महिन्यांत ४८१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:23 AM2017-08-19T02:23:34+5:302017-08-19T02:23:39+5:30

पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत.

481 victims were killed in the 43-month train crash | रेल्वे अपघातात ४३ महिन्यांत ४८१ बळी

रेल्वे अपघातात ४३ महिन्यांत ४८१ बळी

Next

संजु पवार ।
विरार : पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत. त्यातील १४७ जणांच्या वारसांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. दरवाज्यात लटकणे, गर्दीच्या वेळी हात निसटून पडणे, आत्महत्या , चालुु गाडी पकडण्याचा प्रयत्न यासारख्या घटनांमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सफाळे , केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव, डहाणु रोड, बोर्डी, घोलवड या नऊ रेल्वे स्थांनका दरम्यान मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल रेल्वे सेवा सुरू झाली. क्षणार्धात वेग पकडणाºया लोकलचा अंदाज न आल्यानेही अपघात घडून प्रवाश्यांचा जीव गेला आहे. या परिसरात गेल्या ४३ महिन्यांमध्ये ४८१ अपघातात ठार झाले आहेत. यातील ३३४ मृत्युंचा छडा लाऊन पोलिसांनी मृतदेह वारसांच्या ताब्यात दिले आहेत. मात्र मृतांपैकी १४७ जणांची अद्याप ओळख न पटल्याने पेच वाढला आहे.
वैतरणा परिसरातील रेल्वे खांब क्र.१६९/७ ते घोलवड परिसरातील रेल्वे खांब १३५/१७ दरम्यान हे सर्व अपघात घडून आले आहेत. दुसरीकडे, रेल्वेकडून खूपच कमी अनुदान मिळते. अनुदान वाढवून मिळावे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव मंजूरीसाठी रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवरून पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पी आय प्रमोद बाबर यांनी दिली.

Web Title: 481 victims were killed in the 43-month train crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.