घोलवड रेल्वे उड्डाण पूलासाठी ४९ कोटी

By admin | Published: May 6, 2016 01:12 AM2016-05-06T01:12:03+5:302016-05-06T01:12:03+5:30

घोलवड रेल्वे स्थानक कात टाकत असून अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे. आमदार आनंद ठाकूर यांच्या प्रयत्न्नांमुळे घोलवड रेल्वे उड्डाणपूलाकरीता

49 crore for Gholavad railway flyover | घोलवड रेल्वे उड्डाण पूलासाठी ४९ कोटी

घोलवड रेल्वे उड्डाण पूलासाठी ४९ कोटी

Next

- अनिरु द्ध पाटील, डहाणू/बोर्डी
घोलवड रेल्वे स्थानक कात टाकत असून अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे. आमदार आनंद ठाकूर यांच्या प्रयत्न्नांमुळे घोलवड रेल्वे उड्डाणपूलाकरीता ४९ कोटी रु पये राज्य शासन खर्च करणार आहे. उड्डाणपुलामुळे स्थानकाबाहेरील रेल्वे गेट क्र मांक ६१ वर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळणार आहे.
महाराष्ट्र गुजरात सीमेलगतचे घोलवड रेल्वे स्थानक अनेक वर्षांपासून सुविधेपासून वंचित असल्याने गैरसोईचे स्थानक म्हणून ओळखले जाते. प्रवाशांना होणाऱ्या असुविधांबाबत नेहमीच लोकमतने बातमीतून प्रकाश टाकला आहे. आजही फलाट क्र मांक एकचा प्रश्न, रिटर्न तिकीटाची असुविधा आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देणे आदी मागण्या प्रलंबितच आहेत, असे असतांना स्थानकात पायाभूत सुविधांच्या कामाला प्रारंभ झालेला दिसून येत आहे. त्याच बरोबर घोलवड रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला रेल्वेने मंजूरी दिली आहे.
उड्डाणपूलाचा प्रश्न मार्गी लागावा या करिता विधान परिषद आमदार आनंद ठाकूर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घेत, २०१४-१५ च्या अर्थ संकल्पात मंजूरी दिली होती. मात्र रेल्वेकडे निधी नसल्याने उड्डाणपूलाचे काम रखडले होते. नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन, राज्य शासनाने त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी केली होती. ती मान्य झाली आहे. या पूलाचा ४९ कोटींचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे येथील रेल्वे प्रवाशी, नागरिक, बागायतदार आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, संबंधित स्थानकात उड्डाणपुल नसल्याने ६१ क्र मांकाच्या रेल्वे गेटवरून कोसबाड मार्गे डहाणूच्या दिशेने होणाऱ्या रस्ते वाहतुकीला ट्राफिकजाम मधून मुक्ती मिळणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेने देखभाल दुरूस्तीकरिता सदर गेट बंद केल्यानंतर प्रखरता अधिक जाणवली होती.

Web Title: 49 crore for Gholavad railway flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.