आज वसई विरार शहरात 5 मृत्यू; दिवसभरात 120 नवे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 07:40 PM2020-08-24T19:40:09+5:302020-08-24T19:40:15+5:30

वसई विरार शहराची कोरोना मुक्तिकडे वाटचाल

5 deaths in Vasai Virar city today; 120 new patients per day | आज वसई विरार शहरात 5 मृत्यू; दिवसभरात 120 नवे रूग्ण

आज वसई विरार शहरात 5 मृत्यू; दिवसभरात 120 नवे रूग्ण

Next

वसई- वसई विरार शहरात सोमवारी दिवसभरात पाच रुग्णाचा मृत्यू झाला असून ही बाब चिंतेची आहे. तर दिवसभरात 120 नवे रूग्ण आढळून आले व सर्वाधिक असे 220 रूग्ण मुक्त झाल्याची माहिती महापालिकेने दिली.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका हद्दीत आता एकूण रूग्ण संख्या 15 हजार 879  वर पोहोचली आहे. तर शहरात आतापर्यंत एकूण मुक्त रूग्णसंख्या 13 हजार 453 इतकी झाली आहे. तर महापालिका हद्दीतील मृतांची संख्या आता एकूण 330 वर पोहचली असून शहरात विविध रुग्णालयात आता केवळ 2 हजार 096 रूग्ण उपचार घेत असल्यामुळे आता ही आकडेवारी वसई विरार शहराला कोरोना मुक्तीकडे नेत असल्याचे संकेत दिसत आहेत.

Web Title: 5 deaths in Vasai Virar city today; 120 new patients per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.