अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना ५ टक्के निधी
By admin | Published: October 14, 2015 02:13 AM2015-10-14T02:13:31+5:302015-10-14T02:13:31+5:30
या जिल्ह्णातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना थेट ५ टक्के निधी देण्याच्या शासनाच्या योजनंअंतर्गत तलासरी ग्रामपंचायतीला सर्वाधिक ५३ लाख ३२ हजार ८०६ रू. चा निधी उपलब्ध झाला आहे.
पालघर : या जिल्ह्णातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना थेट ५ टक्के निधी देण्याच्या शासनाच्या योजनंअंतर्गत तलासरी ग्रामपंचायतीला सर्वाधिक ५३ लाख ३२ हजार ८०६ रू. चा निधी उपलब्ध झाला आहे. तर सर्वात कमी निधी पालघर तालुक्यातील पथराळी ग्रामपंचायतीला ८७ हजार ७३१ इतका प्राप्त झाला आहे.
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना ५ टक्के थेट निधी देण्याच्या शासन योजनेअंतर्गत तलासरी ग्रामपंचायतीला तर त्या खालोखाल आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांचे गाव असलेल्या वाडा ग्रामपंचायतीच्या १६ हजार ७५० इतक्या लोकसंख्येसाठी ४७ लाख ७१ हजार ९८ इतका निधी प्राप्त झाला आहे. पालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायतीच्या १० हजार ४२१ लोकसंख्येकरीता २९ लाख ६८ हजार ३३५ रू देण्यात आले.
डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येकरीता १३ हजार ६४६ लोकसंख्येकरीता सर्वाधिक ३८ लाख ८६ हजार ९४९ रू., वसई तालुक्यातील भाताणे ग्रामपंचायतीच्या ५ हजार ९१७ लोकसंख्येकरीता १६ लाख ८५ हजार ४०८ रू., विक्रमगड तालुक्यातील दादडे ग्रामपंचायतीच्या ६ हजार ८०२ लोकसंख्येकरीता १९ लाख ३७ हजार ४९३ रू., मोखाडा तालुक्यातील मोखाडा ग्रामपंचायतीच्या १० हजार २७३ लोकसंख्येकरीता २९ लाख २६ हजार १७८, जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रुक कासरवाडी ग्रामपंचायतीच्या ९ हजार ३१९ लोकसंख्येसाठी २६ लाख ५७ हजार २८८ रू. निधी प्राप्त झाला आहे. सर्वात जास्त निधी तलासरीला ५३ लाख ३२ हजार ८०६ रू. तर सर्वात कमी पालघर तालुक्यातील पथराळी ग्रामपंचायतीच्या ३०८ लोकसंख्येकरीता ८७ हजार ७३१ इतका निधी प्राप्त झाला आहे.
वरील सर्व निधी थेट ग्रा. प. ना उपलब्ध झालेला असला तरी तो ग्रामसभा कोलसमितीच्या खात्यावर वर्ग करावयाचा आहे तसेच हा निधी ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या निहाय खर्च होणार नुसार ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सर्व गावांच्या लोकसंख्येनिहाय खर्च करावयाचा आहे. (वार्ताहर)