सराईत वाहन चोरट्याकडून ५ वाहने जप्त; पोलिसांची धडक कारवाई  

By धीरज परब | Published: August 12, 2023 07:01 PM2023-08-12T19:01:58+5:302023-08-12T19:02:02+5:30

वसईच्या शास्त्री नगर भागातून चोरी झालेल्या वाहनाच्या सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

5 vehicles seized from Sarait vehicle thief; Police action | सराईत वाहन चोरट्याकडून ५ वाहने जप्त; पोलिसांची धडक कारवाई  

सराईत वाहन चोरट्याकडून ५ वाहने जप्त; पोलिसांची धडक कारवाई  

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने सराईत वाहन चोरास अटक करून ५ गुन्ह्यातील चोरीची ५ वाहने जप्त केली आहेत. 

आयुक्तालयाच्या हद्दीतील वाहन चोरीच्या वाढत्या घटना पाहता आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल राख, सहायक निरीक्षक दत्तात्रय सरक सह श्रीमंत जेधे, गोविंद केन्द्रे, शिवाजी पाटील, राजाराम काळे, सतिश जगताप, अनिल नागरे, जयकुमार राठोड, हनुमंत सुर्यवंशी, मसुब जवान सचिन चौधरी यांच्या पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्याचा समांतर टिप्स चालवला होता. 

वसईच्या शास्त्री नगर भागातून चोरी झालेल्या वाहनाच्या सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. नालासोपारा, बिलाल पाडाच्या ओम साई नगर मध्ये सापळा रचून गणेश वेलफेअर सोसायटीत राहणाऱ्या नंदकिशोर उर्फ राहुल अशोक सिंग (२२ ) ह्याला अटक केली . चौकशीत त्याने चोरलेल्या दोन दुचाकी व तीन रिक्षा असा ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला . सिंग याने नवघर , माणिकपुर , नालासोपारा , पेल्हार व तुळींज पोलीस ठाणे हद्दीत केलेले ५ गुन्हे उघडकीस आणले . 

Web Title: 5 vehicles seized from Sarait vehicle thief; Police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.