वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:04 AM2020-08-29T00:04:40+5:302020-08-29T00:04:47+5:30

नोटिसा बजावूनही रहिवाशांचा मुक्काम

563 dangerous buildings in Vasai-Virar municipal area; 180 buildings are very dangerous | वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक

वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक

googlenewsNext

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील ९ प्रभागांतील मिळून यंदा ५६३ धोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली असून यातील १८० इमारती अतिधोकादायक म्हणून गणल्या आहेत.

महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. अशा इमारतींमुळे दुर्घटना घडू नये, यासाठी अशा इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी दरवर्षी तयार केली जाते. यंदाही अशीच धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५६३ धोकादायक इमारतींपैकी १८० इमारती अतिधोकादायक बनलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरे रिकामी करण्याच्या किंवा धोकादायक असल्यास त्याला दुरुस्तीची नोटीस देण्यात येते. पालिकेतर्फे या १८० इमारतींना नोटिसा देऊनही रहिवासी त्याच इमारतीत बिनधास्तपणे वास्तव्य करत आहेत.

जुलैमध्ये नालासोपाऱ्यात एका अतिधोकादायक इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर पालिकेने संपूर्ण इमारत जमीनदोस्त केली. तर आॅगस्टमध्ये नालासोपारा पूर्वेकडील काजूपाडा येथील चाळीचा पाया खचला होता. त्यामुळे संपूर्ण चाळ जमीनदोस्त झाली. या दोन्ही घटनांत वेळीच नागरिक बाहेर निघाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसई-विरार शहरामधील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दाट असल्याचे वसईतील सामाजिक कार्यकर्ते राज दासोनी यांनी सांगितले. महाड येथील इमारत दुर्घटनेत ८ ते १० वर्षे जुनी इमारत जमीनदोस्त झाली, मात्र वसईत असलेल्या जुन्या धोकादायक इमारती अतिशय जीर्ण झाल्या असून त्या रिकाम्या केल्या पाहिजे, असे मत वसईकर नागरिक व्यक्त करत आहेत.

नागरिकांची मागणी : संक्रमण शिबिरे निर्माण करण्याचा निर्णय घ्या
दरवर्षी वसई-विरार पालिका प्रशासन मोहीम सुरू करून धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावते. मात्र, यामुळे पालिकेच्या धोकादायक इमारतींत राहणाºया रहिवाशांसमोर दुसºया घराचा पेच निर्माण होतो. दुसरे घर घेणे परवडणारे नसल्यामुळे आणि समाधानकारक पर्याय नसल्याने जायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. अशा नागरिक व रहिवाशांसाठी संक्रमण शिबिराची व्यवस्थादेखील करण्यात आलेली नाही. ती केली तरी तात्पुरती असते, त्यामुळे रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत. दरवर्षी निर्माण होणाºया या परिस्थितीमुळे पालिकेने अशा धोकादायक इमारतींबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत वसईकरांनी व्यक्त केले आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील बहुतेक इमारतींमधील अनेक नागरिकांनी आपली घरे रिकामीदेखील केली आहेत.
- गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

Web Title: 563 dangerous buildings in Vasai-Virar municipal area; 180 buildings are very dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.