पालिकेचे 59 लाख पाण्यात; शहरातील १७ हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:13 AM2021-02-11T00:13:31+5:302021-02-11T00:13:38+5:30

गर्दुल्ल्यांनी या हॅण्डवॉश सेंटरला आपला अड्डा बनवला आहे.  भाजीवाल्यांनीही कब्जा केला आहे. रात्रीच्या किंवा दुपारच्या सुमारास काही जण येथे झोपतात.

59 lakh in municipal water | पालिकेचे 59 लाख पाण्यात; शहरातील १७ हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून

पालिकेचे 59 लाख पाण्यात; शहरातील १७ हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून

Next

नालासोपारा : वसई-विरार महापालिकेने काेरोनाच्या काळात ठिकठिकाणी लावलेले हातधुण्याच्या केंद्रांचा वापर होत नसल्याने महापालिकेचे ५९ लाख ५० हजार रुपये पाण्यात गेले आहेत. या केंद्रातील नळ चोरीला गेले आहेत. गर्दुल्ल्यांनी या हॅण्डवॉश सेंटरला आपला अड्डा बनवला आहे.  भाजीवाल्यांनीही कब्जा केला आहे. रात्रीच्या किंवा दुपारच्या सुमारास काही जण येथे झोपतात.

कोरोना हा विषाणूवाटे पसरणारा घातक आजार आहे. हा विषाणू हातावाटे नाकातोंडात जातो. त्यामुळे हात वारंवार धुणे, निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी  महापालिकेने शहरातील सर्व इमारतींना प्रवेशद्वारावर हात धुण्याचे सॅनिटायझर (हॅण्डवॉश बेसिन) बनवणे अनिवार्य केले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कुठेही हात धुता यावे, निर्जंतुकीकरण करता यावे यासाठी हॅण्डवॉश सेंटर तयार केले. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, नागरिकांची उदासीनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत.
 
हॅण्डवॉश सेंटरवर कुणाची देखरेख नसल्याने तेथील नळ चोरीला गेले आहेत. काही ठिकाणी तर गर्दुल्ल्यांनी आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तेथे फिरकतही नाहीत. एका हॅण्डवॉश सेंटरसाठी साडेतीन लाखांचा खर्च पालिकेने केला आहे. पालिकेने शहरात एकूण १७ हॅण्डवॉश सेंटर उभारले होते. त्यामुळे पालिकेचा ५९ लाख ५० हजारांचा खर्च पाण्यात गेला आहे. 

पालिका अधिकाऱ्यांनी याबाबत  सांगितले की, सध्या या हॅण्डवॉश सेंटरचा उपयोग हात धुण्यासाठी होईल. नंतर पाणपोई म्हणून केला जाईल.
शहरातील वसई येथील पापडी, पारनाका, रेंज ऑफिस, गावराई नाका, गोलानी नाका, अंबाडी रोड, सातिवली तर नालासोपाऱ्यात पाच, विरार येथे दाेन तर अन्य ठिकाणी अशी १७ हॅण्डवॉश सेंटर उभारलेली आहेत. 

शहरात १७ ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारली आहेत. नागरिकांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी या केंद्रातून हात धुवावेत. नंतर, आम्ही या हॅण्डवॉश सेंटरचा उपयोग कायमस्वरूपी पाणपोईसाठी करणार आहोत. त्यामुळे पैसे वाया गेले असे म्हणता येणार नाही. 
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका

Web Title: 59 lakh in municipal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.