वाशाळा येथे आढळली ६ तीव्र कुपोषित बालके
By admin | Published: April 26, 2017 11:33 PM2017-04-26T23:33:24+5:302017-04-26T23:33:24+5:30
श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रविवारी घेतलेल्या शिबिरात सहा तीव्र कुपोषित बालके आढळून आली.
मोखाडा : श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रविवारी घेतलेल्या शिबिरात सहा तीव्र कुपोषित बालके आढळून आली. वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वाशाळा अंगणवाडीमध्ये जाऊन ७४ बालकांची तपासणी करण्यात आली असून यातील ६ तीव्र कुपोषित बालकांना तातडीच्या उपचाराची गरज असल्याचे समोर आले. या बालकांच्या माता देखील कुपोषित असून त्यांच्यात देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. अजूनही सरकारकडे याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने कुपोषणाचे वास्तव जैसे थे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी तपासणी शिबिर वेग वेगळ््या प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केले जाते. या भागात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने ट्रस्ट च्या माध्यमातून मुंबई ठाण्यातील तज्ञ डॉक्टर्सच्या मदतीने असे शिबीर घेऊन बालकांची तपासणी करून त्यांना आवश्यक तेथे पुढील उपचार दिला जातो. यात काहींना बाल संजीवन छावणीमध्ये दाखल केले जाते तर काहींना ज्युपिटर, केइएम आणि इतर हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ नेले जाते. आज झालेल्या शिबिरात बालरोग तज्ञ डॉ.सबा आणि डॉ.स्वप्नाली जाधव यांच्या पथकाने ७४ बालकांना तपासले. (वार्ताहर)