जव्हारमध्ये तीन बँकेतील 6 कर्मचारी बाधित; हजारो मजूर तथा निराधार व्यक्तींना लागणची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:43 PM2020-07-17T20:43:51+5:302020-07-17T20:48:41+5:30

लॉकडाऊन करताना जीवनावश्यक वस्तूही बंद करण्यात आल्या होत्या, फक्त दूध विक्री सुरू होती, भाजीपाला,  किराणा आदी बंद होते त्यामुळे मागील काही दिवसांत बधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता

6 employees of three banks affected in Jawahar; Fear of contagion to thousands of laborers and homeless people | जव्हारमध्ये तीन बँकेतील 6 कर्मचारी बाधित; हजारो मजूर तथा निराधार व्यक्तींना लागणची भीती

जव्हारमध्ये तीन बँकेतील 6 कर्मचारी बाधित; हजारो मजूर तथा निराधार व्यक्तींना लागणची भीती

Next

हुसेन मेमन

जव्हार - मागील काही दिवसांपासून जव्हार शहरात सतत लॉकडाऊन सुरू आहे, मात्र या काळात बँका सुरू ठेवल्यामुळे बधितांची संख्या वाढली असून, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चार कर्मचारी, महाराष्ट्र बँकेचा एक तर स्टेट बँकेचा एक कर्मचारी असे सहा बँकेचे कर्मचारी एकाचवेळी पॉझिटिव्ह आढळले असून शहरात काळजीचे वातावरण आहे.

लॉकडाऊन करताना जीवनावश्यक वस्तूही बंद करण्यात आल्या होत्या, फक्त दूध विक्री सुरू होती, भाजीपाला,  किराणा आदी बंद होते त्यामुळे मागील काही दिवसांत बधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता. एकूण 154 बधितांपैकी गुरुवार पर्यंत 150 रुग्ण पूर्ण बरे घरी गेले होते, फक्त 4 बाधित उपचार घेत होते, मात्र शुक्रवारी अचानक नऊ बधितांचा आकडा वाढला यात बँकेचे सहा कर्मचारी आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात किती ग्राहक बाधित झाले हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेत दररोज हजारोंच्या संख्येने आदिवासी गरीब मजूर, निराधार तथा इतर ग्राहक जव्हार शहरात दाखल होत होते, तसेच निराधार व्यक्ती हे वयस्कर असलंयामुळे बँकेत येणाऱ्या हजारो मजूर तथा निराधार व्यक्तींना तपासणीचा भार आरोग्य विभागावर येऊन ठेपला आहे.

बँकेत गर्दी होत असल्याबाबत बाबत वारंवार प्रशासनाला बातमीच्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमांनी अवगत केले होते, मात्र आपत्ती व्यायवस्था विभााागने दुर्लक्ष केले आणि आज पुन्हा जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा धोका घोंगावत आहे. फक्त बाजारपेठ बंद करण्याचा काही प्रतिष्ठित व्यक्ती घाट घालत होते,  प्रशासनाने त्यांची दाखल घेतली मात्र त्याचवेळी बँकाही बंद करण्याबाबत प्रयत्न केले पाहिजे होते अशी चर्चा जोर धरत आहे. तसेच बँकेच्या बाहेरची गर्दी पांगवण्यासाठी जर यंत्रणेने  वेळोवेळी प्रयत्न केले असते तर आज ही परिस्थिती नसती.
 

Web Title: 6 employees of three banks affected in Jawahar; Fear of contagion to thousands of laborers and homeless people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.