पालघर जिल्ह्यात ६३ रिसॉर्टना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 06:54 AM2017-12-31T06:54:58+5:302017-12-31T06:55:10+5:30
३१ डिसेंबरच्या तोंडावरच विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे जागे झालेल्या महसूल खात्याने अनधिकृत रिसॉर्टना नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली आहे.
- शशी करपे
वसई : ३१ डिसेंबरच्या तोंडावरच विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे जागे झालेल्या महसूल खात्याने अनधिकृत रिसॉर्टना नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. तर जिल्हाधिकाºयांनी महापालिकेला अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातच पोलिसांनी नियम तोडले तर कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी दिल्याने यंदा रिसॉर्टमधील पार्ट्यांना लगाम बसला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरची मजा लुटण्याºयांची निराशा होणार आहे.
काही मोजके रिसॉर्ट वगळता ८३ रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात उजेडात आले आहे. त्यानंतर सरकारी गुरचरण जमिनीवर अतिक्रमण करून कळंब आणि राजोडी परिसरात बांधलेल्या ६३ बेकायदा रिसॉर्टना महसूल खात्याने नोटीसा बजावून ही सर्व रिसॉर्ट जमिनदोस्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी वसई प्रांताधिकाºयांना दिले आहेत. त्यानंतर दीपक क्षीरसागर यांनी महसूल आणि पोलीस अधिकाºयांची तातडीची बैठक घेऊन रिसॉर्टवर कारवाई करण्याचा आराखडा तयार केला आहे. तर अनधिकृत असलेल्या ८३ रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश नारनवरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. महापालिका २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकारी असल्याने Þपालिकेमार्फत कारवाई होणार आहे.
पोलिसांची करडी नजर
३१ डिसेंबरच्याआठ दिवस आधी महसूल खात्याने रिसॉर्टविरोधात कारवाईचा बडगा उगारला असतांना पोलिसांनी सर्व रिसॉर्ट चालकांची बैठक बोलावून ३१ डिसेंबरला नियमानुसारच नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी रिसॉर्ट चालकांना एक नियमावली दिली असून त्यानुसारच पार्टी आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतेक रिसॉर्टमध्ये रात्रभर चालणाºया पार्ट्यांना कात्री लावण्यात आली आहे. चहा नाश्ता आणि जेवण असाच मेनू बहुतेक रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला रात्री बारा वाजता रिसॉर्टमधील कार्यक्रम बंद केले जाणार आहेत.