वसईमध्ये ६५० धोकादायक इमारती
By admin | Published: August 5, 2015 12:57 AM2015-08-05T00:57:14+5:302015-08-05T00:57:14+5:30
वसई-विरार उपप्रदेशात सुमारे ६५० इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून
वसई : वसई-विरार उपप्रदेशात सुमारे ६५० इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून संबंधीत भाडेकरूंना नोटीसाही बजावल्या होत्या. २ वर्षापुर्वी नालासोपाऱ्यातही १ इमारत कोसळून २ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. सोमवारी मध्यरात्री ठाण्यात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेण्याची मागणी होत आहे.
वसई, विरार, नालासोपारा परिसरात अनेक धोकादायक इमारती असून महानगरपालिका वेळोवेळी त्या रिकाम्या करण्यासंदर्भात नोटीसा बजावत असते. परंतु, भाडेकरू घरे रिकामी करण्यास तयार नसतात. त्यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक धोकादायक इमारती नालासोपारा परिसरात आहेत. दरवर्षी महानगरपालिका अशा धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करीत असते. (प्रतिनिधी)