पालघर नगरपरिषदेसाठी ६७.५७% मतदान; आज मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:30 AM2019-03-25T01:30:58+5:302019-03-25T01:31:02+5:30

लोकसभेआधीचा ‘सराव’ म्हणून पाहिल्या गेलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ६७.५७ टक्के मतदान झाले. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे मतदारांनी पाठ फिरविल्याने मतदान केंद्रात शुकशुकाट होता.

67.57% voting for Palghar Municipal Council; Today counting | पालघर नगरपरिषदेसाठी ६७.५७% मतदान; आज मतमोजणी

पालघर नगरपरिषदेसाठी ६७.५७% मतदान; आज मतमोजणी

Next

पालघर : लोकसभेआधीचा ‘सराव’ म्हणून पाहिल्या गेलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ६७.५७ टक्के मतदान झाले. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे मतदारांनी पाठ फिरविल्याने मतदान केंद्रात शुकशुकाट होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदान केंद्रावर एकच झुंबड उडाली होती.
दरम्यान, वेऊर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सायं. ६.४५ वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवण्यात आले होते, असा आरोप करीत एका अपक्ष उमेदवाराने मतदान केंद्रावर गोंधळ घातला. एका राजकीय पक्षाला मदत करण्याच्या हेतूने निवडणूक अधिकाऱ्यांनी हे केंद्र सुरू ठेवल्याचे त्याचे म्हणणे होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत, त्याला ताब्यात घेत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर, सहायक निवडणूक अधिकारी महेश सागर, प्रशांत ठोंबरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
हा प्रकार गैरसमजुतीतून घडला आहे. इतरत्र निवडणूक शांततेत पार पडल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

महिला उमेदवारांत बाचाबाची
पालघरची नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पडली, असे जरी निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे असले, तरी महिला उमेदवारांत झालेली बाचाबाची चर्चेचा विषय ठरली. येथील टिष्ट्वंकल स्टार शाळेतील मतदान केंद्राबाहेर दोन महिला उमेदवारांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर बाचाबाचीमध्ये झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, शिवाय एसटी आगार, आनंद आश्रम शाळा या केंद्रांवर काही प्रभागात बोगस मतदारांच्या तक्र ारीही आल्या.

Web Title: 67.57% voting for Palghar Municipal Council; Today counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर