६९ गावांना ‘सूर्या’चेच पाणी

By admin | Published: March 30, 2017 05:31 AM2017-03-30T05:31:29+5:302017-03-30T05:31:29+5:30

६९ गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याने वसई तालुक्यातील

69 9 'water of sun' | ६९ गावांना ‘सूर्या’चेच पाणी

६९ गावांना ‘सूर्या’चेच पाणी

Next

शशी करपे / वसई
६९ गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याने वसई तालुक्यातील ६९ गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. सध्या वसई विरार महापालिकेलाच पाणीटंचाई जाणवत असल्याने वाढीव १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर ६९ गावांना पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ६९ गावांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
वसई विरार महापालिका हद्दीतील ६९ गावांना पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २००८ साली मंजूरी दिली होती. या योजनेचे काम २०१० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही ६९ गावांना अद्याप पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी योजना पूर्ण का केली नाही याबाबत जनहित याचिका १२ जून २०१३ रोजी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. इतकेच नाही तर ३० जून २०१४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. मात्र, आतापर्यंत शंभर कोटींहून अधिक रुपये खर्च करुनही योजनेचे पाच टक्के काम बाकी असल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. त्यावर कळस म्हणजे जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने राज्य सरकारकडे ३३ कोटी ७८ लाख ९७ हजार रुपयांची मागणी केली असताना सरकारकडून निधी पुरवला न गेल्याने योजना रखडल्याचे उजेडात आले आहे.
गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या योजनेचे लेखापरिक्षण करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती.
दरम्यान, समर्थन संस्थेने याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केला असता, वसई विरार महापालिकेसाठी वाढीव १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेतून ६९ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या योजनेच्या कामासाठी एकूण चार निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन निविदांना तीन तर एका निविदेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीत ९० कोटी ११ लाख रुपये खर्च झाला असून ९८ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा लोणीकर यांनी केला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार योजनेच्या कामाची तपासणी करण्यासाठी प्राधिकरणाच्या सहाय्यक मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपला अहवाल कोर्टाला १९ आॅगस्ट २०१४ रोजी सादर केल्याची माहितीही लोणीकर यांनी दिली आहे.

काय आहे वस्तुस्थिती?
सध्या ६९ गावांपैकी ५२ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. या गावांना महापालिकेच्या योजनेतून पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. मात्र, सध्या महापालिका हद्दीत तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ६९ पैकी १० गावांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेला ९२ एमएलडी पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे सूर्यातून वाढीव १०० एमएलडी पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतरच उर्वरित गावांना पाणी दिले जाईल.

Web Title: 69 9 'water of sun'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.