६९ गावे अजून तहानलेलीच, लोकायुक्तांचा दाद मागण्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:40 AM2017-11-06T03:40:24+5:302017-11-06T03:40:30+5:30
तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
वसई : तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी माजी नगरसेवकांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली असता त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.
वसई विरार उपप्रदेशातील ६९ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंतांना कार्यादेश देण्यात आले होते. या योजनेचे काम रखडल्याने तब्बल तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेच्या कामासाठी आतापर्यंत शंभर कोटी रुपये खर्च झाले असून गावांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा अद्याप सुरु झालेला नाही.
याप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी प्राधिकरणाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर यांनी योजनेचे फक्त ५ टक्के काम शिल्लक राहिले असल्याचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले होते. तद्नंतर योजनेची अंमलबजावणी ताबडतोब करा असे निर्देश न्यायमुर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीन वर्षांपूर्वी दिले होते. पण, आजपर्यंत पाण्याचा एकही थेंब ६९ गावांमध्ये पोचू शकलेला नाही.
याप्रकरणी योग्य त्या कार्यवाहीसाठी न्यायालयाकडेच दाद मागणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी या कार्यालयाला अधिकार क्षेत्राअभावी हस्तक्षेप अथवा चौकशी करता येत नाही. त्यासाठी आपण सक्षम अधिकारी अथवा शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागणे उचित ठरेल. यास्तव उप लोक आयुक्तांची भूमिका आहे.